क्रांतीवीर चिमासाहेब यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील माहिती पुस्तिका काढणार…..

0
63

प्रतिनिधी : प्राध्यापिका मेघा पाटील

कोल्हापूर: टाऊन हॉल जुन्या कोर्टाच्या इमारतीमध्ये असणारे क्रांतिकारक चिमासाहेब महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन प्रतिवर्षी प्रमाणे हुतात्मा क्रांती सामाजिक संस्था आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे वतीने आज क्रांतीवीर चिमासाहेब महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला करण्यात आले
त्यांच्या पुतळ्याला माजी नगरसेवक आर डी पाटील व ऍड.जगजीत आडनाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना अध्यक्ष किसनराव कल्याणकर यांनी क्रांतीवीर चिमासाहेब महाराजांचे स्वातंत्र्य पूर्व काळातील लढा धगधगता असल्याचे सांगून त्यांचे योगदान देशाच्या इतिहासात महत्वपूर्ण आहे.. स्वातंत्र्याचा इतिहासाच्या चिमासाहेब यांचे नाव सोन्याच्या अक्षराने कोरावे लागेल.. असे प्रतिपादन केले.संस्थेचे सचिव पद्माकर कापसे यांनी पुढील वर्षात चिमासाहेब यांचा रक्तरंजित स्वातंत्र्य संग्रामातील इतिहास नव्या पिढीला माहिती व्हावा यासाठी पुस्तिका प्रकाशित करून संपूर्ण कोल्हापूर जिल्हाभर त्याचं वितरण करणार असल्याचे सांगितले.. ऍड. जगजीत आडनाईक यांनी मनोगत व्यक्त केले. हुतात्मा क्रांती सामाजिक संस्था आणि कोल्हापूर जिल्हा असल्याचे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष डाॅ.गुरुदत्त म्हाडगुत,चिन्मय सासने, अॅड नवतेज देसाई, अॅड अश्विनी भोसले, अॅड असिना शेख, जयकुमार शिंदे, लक्ष्मण मोहिते, सुनिल हंकारे, निलेश कांबळे, किशोर यादव यांच्यासह अनेक सामाजिक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here