आयुर्वेदात मधाचे आरोग्याला होणारे अनेक फायदे सांगितले आहेत. यात असणाऱ्या औषधी गुणांमुळे मधाला आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी चांगलं मानलं जातं. याच कारणाने अनेक समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार म्हणून याचा वापर केला जातो.
मात्र, मधाचे फायदे मिळवण्यासाठी याचा योग्यपणे वापर करणं फार गरजेचं असतं. एक्सपर्ट्सनुसार, याचं चुकीच्या पद्धतीने सेवन केलं तर आरोग्याला नुकसानही होऊ शकतं.
मधाचे शरीराला होणारे फायदे
डॉक्टर दीक्षा भावसार यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी मधाच्या फायद्यांबाबत सांगितलं आहे. यात त्यांनी लिहिलं की, मधाला बेस्ट आयुर्वेदिक फॅट बर्नर म्हणून ओळखलं जातं.
डोळ्यांसाठीही याचे खूप फायदे होतात. याने तहान भागवण्यापासून ते कफ दूर करणे, ब्रोन्कियल अस्थमा आणि खोकलाही दूर होतो. तसेच मध एक नैसर्गिक डिटॉक्सीफायरसारखं काम करतं. हार्ट हेल्थपासून ते त्वचा सुंदर करण्यासाठीही याचा वापर केला जातो. हे फायदे मिळवण्यासाठी याचं योग्य पद्धतीने सेवन करणं गरजेचं आहे.