आमदार पात्र होऊ अथवा अपात्र; आम्ही २० जानेवारीला मुंबईत मोर्चा काढू: मनोज जरांगे

0
71

छत्रपती संभाजीनगर : आमदार पात्र होतील अथवा अपात्र त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. मराठा आरक्षणासाठी २० जानेवारी रोजी मुंबईला मोर्चा काढू, असे मनोज जरांगे म्हणाले.

आमच्या नोंदी सापडलेल्या असतानाही कायदा पारित होत नाही.

बैठका होत राहतात मात्र त्यातून काही होत नाही. २० जानेवारी रोजी मुंबईला निघण्याची तयारी झालेली आहे . तयारी अंतिम टप्प्यात आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही. किती लोक येणार आहे याचा शोध घेण्यासाठी सरकारी यंत्रणाही कामाला लागली आहे, असे जरांगे म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे कारानरे मनोज जरांगे पाटील यांना व्हायरल फिव्हरमुळे मंगळवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगरातील एक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तापामुळे त्यांना अशक्तपणा आला आहे, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.

सरकारचा आकडा चुकणार
सरकार म्हणतंय २० तारखेच्या आत आरक्षण देऊ, मागच्या वेळेसही म्हटले होते. आता आम्ही मागच्या घटनेवरून सावध झालो आहोत. आम्ही शांततेत आंदोलन करणार असून, पुण्यापासून पुढे आंदोलकांची जास्त संख्या असणार आहे. मुंबईजवळ जाताच हा आकडा २ ते ३ कोटीपर्यंत जाईल. समाज बांधवांची एवढी संख्या असली तरी कुणालाही त्रास होणार नाही. सरकारचा आकडा कमी असला तर तो चुकणार, कारण संख्या अफाट राहणार असल्याचे जरांगे – पाटील म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here