आपली त्वचा सुंदर असावी, आपण कायम तरूण दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. (Beauty Tips) सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ताण-तणाव, प्रदूषणामुळे लोक आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकत नाहीत. (How to Treat Skin Hyperpigmentation Naturally) यामुळे त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात.
यापैकीच एक म्हणजे पिग्मेंटेनशन चेहऱ्यावर सुरकुत्या आल्याने ओव्हरऑल दिसण्यावरही परिणाम दिसून येतो. पण बदलत्या लाईफस्टाईलमध्ये स्किनवर वेगवेगळे इफेक्ट्सही दिसून येतात. त्वचेवर दिसणाऱ्या सुरकुत्या वाढत्या वयाचे लक्षण मानले जाते. (Home Remedies For Pigmentation)
धूळ-प्रदूषण, सनबर्न, पोट साफ न होणं यामुळे काळे डाग दिसून येतात. (Pigmentation Solution) यामुळे चेहऱ्याचे सौंदर्यही कमी होते. (Home Remedies For Pigmentation) डॉक्टर स्वागत तोडकर सांगतात की खाण्याचा सोडा, तुरटी आणि लिंबू एका भांड्यात मिक्स करून हे मिश्रण चेहऱ्याला लावा. १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. या उपायाने चेहऱ्यावर तेज येईल आणि काळेपणाही दूर होईल.
वांग दूर करण्यासाठी घरगुती उपाय (Powerful Home Remedies To Get Rid of Skin Pigmentation)
१)तुळशीची पानं
चेहऱ्यावरील वांग काढून टाकण्यासाठी तुम्ही तुळशीच्या पानांची मदत घेऊ शकता. तुळशीची पानं वाटून यात लिंबाचा रस मिसळा आणि ३ ते ४ थेंब लिंबाचा रस मिसळून तुळशीची पानं चेहऱ्याला लावा. लवकरच सुरकुत्या आणि वांग दूर होतील आणि डार्क सर्कल्सची समस्या कमी होईल.
२) जीऱ्याचं पाणी
जीऱ्याचे पाणी चेहऱ्याला लावल्याने सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. २ ते ३ चमचे जीरं रोज सकाळी पाण्यात उकळवा. जेव्हा पाणी थंड होईल तेव्हा या पाण्याने चेहरा धुवा. यामुळे सुरकुत्या कमी होऊ लागतील.
३) बटाट्याचा रस
बटाट्याचा रस काढून त्यात कॉटन बॉल बुडवा आणि हा बॉल चेहऱ्यावर फिरवा. बटाट्याचा चेहऱ्याला लावलेला रस सुकल्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. यामुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल. बटाटा त्वचेवर लावल्याने डार्क सर्कल्स कमी होतात. चेहरा टॅन होत नाही आणि पिंपल्स कमी होतात.