कोल्हापूर- मुंबई मार्गावर १ ऑक्टोबरपासून रोज विमानसेवा; व्यापारी, उद्योजकांची होणार सोय

0
85

कोल्हापूर : कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर १ ऑक्टोबरपासून रोज विमानसेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी गुरुवारी दिली. स्टार एअर या कंपनीकडून, कोल्हापूर ते मुंबई आणि मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर दैनंदिन विमानसेवा सुरू होणार आहे.

आठवड्यातील सातही दिवस मुंबईसाठी विमानसेवा सुरू होत असल्याने व्यापारी, उद्योजक, कलाकार, खेळाडू अशा सर्वांचीच सोय होणार आहे.

रोज सकाळी साडेनऊ वाजता मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने विमान उड्डाण करेल. सकाळी साडेदहा वाजता हे विमान कोल्हापुरात येईल. त्यानंतर सकाळी दहा वाजून ५० मिनिटांनी, कोल्हापूर विमानतळावरून मुंबईच्या दिशेने विमान झेप घेईल आणि सकाळी अकरा वाजून ५० मिनिटांनी ते मुंबई विमानतळावर उतरेल.

त्यामुळे कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना दिवसभरातील मुंबईतील कार्यालयीन कामे करणे सोयीचे ठरणार आहे. आठवड्यातील सातही दिवस मुंबई- कोल्हापूर- मुंबई या मार्गावर विमानसेवा सुरू होत असल्याने, कोल्हापूरच्या औद्योगिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here