टोमॅटो जास्त खाल्ल्याने हे आजार होतात ? या लोकांनी अजिबात खाऊ नयेत

0
114

टोमॅटोपासून ग्रेव्ही, चटणी, सलाड, सॉस आणि सूप सारख्या अनेक रेसिपी तयार करतो. तसेच भाजी, कालवण, भूर्जी, ऑम्लेट आणि सॅंडविच सारखे अनेक पदार्थ तयार करीत असतो. टोमॅटोत फास्फोरस, पोटेशियम, कॅल्शियम, विटामिन्स सी, एंटीऑक्साडेंट, पोटॅशियम आणि एंटीइंफ्लेमेटरी अशी पोषकतत्वे असतात.

आरोग्यासाठी हे सर्व पोषक आहेत. काही जण टोमॅटोचा आहारात जादा वापर करतात. परंतू टोमॅटो जादा खाणे धोकादायक ठरु शकते.

किडनी स्टोन

टोमॅटोत जास्त प्रमाणात कॅल्शियम ऑक्सोलेट नावाचा घटक असतो. टोमॅटोचा जादा वापर आहारात केल्याने तुम्हाला किडनी स्टोनची समस्या होऊ शकते. ज्या लोकांना आधी पासूनच मुतखड्याचा त्रास असेल तर त्यांनी टोमॅटो वर्ज्य करावेत असे आयुर्वेदात म्हटले आहे. त्यामुळे किडनी डॅमेजचा देखील धोका असतो.

एसिडीटी

टोमॅटो एसिडिक तत्वामुळे जास्त सेवन केल्याने गॅस्ट्रीक एसिड तयार करण्याचे काम करते. अशा तु्म्ही जर जास्त टोमॅटो खाल्ले तर तुमच्या छातीत जळजळ, एसिडीटी, एसिड रिफलक्स आणि पचनाशी जोडलेल्या समस्या तयार होऊ शकतात. ज्यांना एसिडीटीची समस्या जास्त आहे. त्या लोकांनी टोमॅटोच्या वाट्याला जाऊ नये. खाल्ले तर अतिशय कमी प्रमाणात खावे.

सांधे दुखीची समस्या

टोमॅटोत सोलनिन नावाचे अल्कलॉइड आढळते. यामुळे तुमच्या सांध्यात सूज आणि दुखू शकते. टोमॅटो आपल्या पेशीत कॅल्शियम तयार करण्याचे काम करते. त्यामुळे तुम्हाला सूज येऊ शकते. टोमॅटोने तुम्हाला संधीवाताची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे उठणे, बसणे आणि चालणे देखील कठीण होऊ शकते.

एलर्जीची समस्या

टोमॅटोत हिस्टामाइन नावाचे तत्व आढळते. ज्यामुळे शरीरात एलर्जीची समस्या निर्माण होऊ शकते. टोमॅटोच्या जादा सेवनाने गळ्यात जळजळ, शिंका येणे, एक्झिमा, जीभ, चेहरा आणि तोंडात सूजेची समस्या निर्माण होऊ शकते. जर तुम्हाला या सर्व समस्या आधी पासूनच आहेत तर टोमॅटोची आहारातील वापर टाळावा.

आतड्यांची समस्या

जास्त टोमॅटो सेवनाने तुमच्या आतड्यांची समस्या निर्माण होऊ शकते. जास्त टोमॅटो सेवनाने पोटात इरिटेबल बॉवल सिंड्रोमला ट्रीगर करू शकते. यामुळे आतड्यांचा त्रास होऊ शकतो. ज्या लोकांना आधीपासून अपचनाचा त्रास आहे. त्यांनी टोमॅटो खाताच त्यांचे पोट फुगते. त्यामुळे या लोकांनी देखील टोमॅटो खाण्यापासून दूर राहायला हवे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here