
सायबर ट्रस्ट संचलित महिला महाविद्यालयामध्ये गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी

:गुरुपौर्णिमेच्या औचित्याने मा. प्रा. डॉ. ए. डी. शिंदे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन कॉलेज ऑफ नॉन-कन्वेन्शनल व्होकेशनल कोर्सेस फॉर विमेन, सायबर ट्रस्ट, कोल्हापूर येथे गुरुवार, दि. १० जुलै २०२५ रोजी कार्यालयाच्या ओपन स्पेसमध्ये आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सहा. प्रा. ऋतिका चंदवानी यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. ए. डी. शिंदे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सहा. प्रा. प्राज्ञा कापडी (प्रमुख, फॅशन डिझाईन विभाग), सहा. प्रा. नीलम जिरगे (प्रमुख, अन्नतंत्रज्ञान विभाग), सहा. प्रा. प्रीती गारगटे (प्रमुख, इंटेरियर डिझाईन विभाग), सहा. प्रा. प्रियांका चव्हाण (प्रमुख, पर्यावरण विज्ञान विभाग), सहा. प्रा. उमेसमेरा रहिमतपूर (प्रमुख, वाणिज्य विभाग) आणि सहा. प्रा. श्वेता ए. पाटील (IQAC समन्वयक) यांनीही प्रतिमापूजन करून श्रद्धांजली अर्पण केली. प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी यांनी महर्षी व्यास, दिवंगत डॉ. ए. डी. शिंदे साहेब तसेच गुरूपौर्णिमेचे महत्त्व याविषयी भाषण केले. कु. समृद्धी गोऱ्हे (बी.एस्सी. (एफटीएम) द्वितीय वर्ष) हिने एक श्लोक म्हटला आणि त्याचा अर्थ समजावून सांगितला. सहा. प्रा. प्रियांका चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. . कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अनुराधा कुंभार समन्वयक डे ऑबझर्विंग समिती यांनी केले. डॉ.आर.ए.शिंदे,अध्यक्ष व कार्यकारी विश्वस्त व सीए एच. आर. शिंदे, सचिव सायबर ट्रस्ट यांनी मोलाचे सहकार्य केले.
