सायबर महाविद्यालयात ‘उच्च शिक्षणातील नीतिमत्ता व मूल्ये’ विषयक शिक्षक विकास कार्यक्रमाचे उद्घाटन…

0
83

सायबर महाविद्यालयात ‘उच्च शिक्षणातील नीतिमत्ता व मूल्ये’ विषयक शिक्षक विकास कार्यक्रमाचे उद्घाटन…

प्रतिनिधी श्रीकांत शिंगे

कोल्हापूर : छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च, कोल्हापूर व इनिशिएटिव्ह ऑफ चेंज, आशिया प्लॅटू, पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने **‘उच्च शिक्षणातील नीतिमत्ता व मूल्ये’ या विषयावर शिक्षक विकास कार्यक्रमाचे उद्घाटन १५ जुलै २०२५ रोजी संपन्न झाले.**या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक **डॉ. आर. एस. कामत** यांनी केले. त्या म्हणाल्या की, सायबर महाविद्यालय यंदा **सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत असून** त्याचाच एक भाग म्हणून विविध महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी हा पहिला कार्यक्रम राबवण्यात येत आहे.

कार्यक्रमात **महाविद्यालयाच्या प्रभारी संचालक डॉ. बिंदू मेनन** यांनी इनिशिएटिव्ह ऑफ चेंज पाचगणीचे **विश्वस्त श्री. किरण गांधी** यांचा सत्कार केला. तसेच **इंजिनीयर डी. एस. माळी** यांनी विश्वस्त **श्री. प्रभाकर वर्तक** यांचा सत्कार केला, तर **प्रा. मधुरा माने** यांनी फॅसिलिटेटर **श्री. किशोर लोकरे** यांचा सत्कार केला.डॉ. बिंदू मेनन म्हणाल्या, *“विद्यार्थ्यांच्या जीवनात नैतिक मूल्ये रुजविण्यासाठी व संस्थेच्या प्रगतीसाठी अशा कार्यक्रमांचे योगदान मोठे आहे.”*मुख्य अतिथी श्री. किरण गांधी म्हणाले, *“व्यक्तिमत्त्वातील वैयक्तिक बदलातूनच जागतिक परिवर्तन शक्य आहे.

युवकांचा सर्वांगीण विकास साधत त्यांना समाजासाठी रोल मॉडेल बनविण्याचा संस्थेचा उद्देश आहे.”*कार्यक्रमात **श्री. किशोर लोकरे** यांनी *“कार्यक्रमाकडून तुमची काय अपेक्षा आहे आणि त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय गुंतवणूक करू शकता?”* या दोन प्रमुख प्रश्नांवर चर्चासत्र घेतले. **‘ट्री ऑफ होप’** या उपक्रमातून सहभागींच्या प्रतिक्रिया समजून घेण्यात आल्या. यावेळी त्यांनी **पवित्रता, प्रामाणिकपणा, निस्वार्थपणा व प्रेम** या मूल्यांचे महत्त्व स्पष्ट केले.दुपारच्या सत्रात श्री. लोकरे यांनी **नैतिकता आणि वैयक्तिक व व्यावसायिक अनुभव** या विषयावर केस स्टडीच्या माध्यमातून संवाद साधला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन **प्रा. स्नेहा नागावकर** यांनी केले. आभारप्रदर्शन **प्रा. एम. बी. पाटील** यांनी केले.हा कार्यक्रम **डॉ. आर. एस. कामत व प्रा. एम. बी. पाटील यांच्या समन्वयाने**, प्रभारी संचालक **डॉ. बिंदू मेनन**, अध्यक्ष **डॉ. आर. ए. शिंदे** आणि सेक्रेटरी **सीए एच. आर. शिंदे** यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here