निरागस हास्य फुलवण्यासाठी नमस्ते नासिक फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम!

0
12


जिथे कमी तिथे आम्ही या तत्त्वाला अनुसरून समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी कार्यरत असलेल्या नमस्ते नाशिक फाउंडेशन यांच्यातर्फे दिनांक 22 जुलै 2025 रोजी नाशिक येथील निरीक्षण गृह व बालगृह उंटवाडी रस्ता त्रिंबक रोड येथे हास्य योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते.फाउंडेशनच्या अध्यक्ष स्नेहल देव यांनी महिला व मुलींना विविध व्यायामाचे प्रात्यक्षिके दाखवून त्यांच्याकडून व्यायाम करून घेतला, ह्या उपक्रमामागील उद्देश म्हणजे बाहेरच्या जगाशी फारसा संबंध नसलेल्या निरीक्षणगृहातील मुले व मुली यांच्या निरागस चेहऱ्यावरती आनंदाची झुळूक उमटवणे व त्यांच्या मनात सकारात्मक ऊर्जा संचारित करणे, त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्याचा हा एक संवेदनशील आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम ठरला आहे.
सामाजिक बांधिलकी जपत निरीक्षण गृहातील मुले व मुली यांना हास्य योगा सत्राबरोबरच सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटपही करण्यात आले.
याप्रसंगी नमस्ते नाशिक फाउंडेशनचे अध्यक्ष स्नेहल देव यांनी आजवर घेतलेला हा सर्वात उत्कृष्ट आणि सेवाभावी उपक्रम ठरला आहे. त्या पुढे म्हणाल्या बालकांच्या जीवनात केवळ भौतिक गरजाच नव्हे तर प्रेम, हास्य आणि माणुसकीची उब देखील महत्त्वाची आहे. आमच्या या छोट्याशा प्रयत्नांनी त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास बीके पाखले, चंदुलाल शहा,अनिल नहार, अश्विनी कुलकर्णी, अनिता शेट्टी, सुरेखा बोरसे, रंजना चिंचोरे, मेघना बरोटे, सुवर्ण सायकर, दीपा भावसार, पुष्पलता चोपडे, जयंत जामदार, आदी मान्यवर उपस्थित होते. हास्य हे आरोग्याचे टॉनिक आहे हे अधोरेखित करण्याचा हा कार्यक्रम निश्चितच एक अनुकरणीय सामाजिक पाऊल ठरणार आहे असे कार्यक्रमाचे अध्यक्ष मातोश्री ट्रॅव्हल्स चे अध्यक्ष आनंद चोरडिया यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here