
कराड (प्रतिनिधी)* – शिवसेना उपनेत्या प्रा. सुषमाताई अंधारे यांनी उंब्रज (ता. कराड) येथील *हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अभ्यास केंद्राला* धावती सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी आपल्या शिवसेनेतील आठवणींना उजाळा दिला.प्रा. अंधारे म्हणाल्या, “२३ जानेवारी २००६ रोजी शिवसेनाप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त मी STD बुथमधून त्यांना फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या. त्या फोनचे बिल आजही जपून ठेवले आहे.

तसेच, २३ जानेवारी २०१२ रोजी त्यांच्या अंगरक्षक मास्टर थापा यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ६२ किलो वजनाची, २२ हजार २३४ रुद्राक्षांची रुद्राक्षतुला केली होती. त्या रुद्राक्षांच्या रांगेत उभे राहत मला दोन रुद्राक्ष मिळाले, ही माझ्यासाठी अमूल्य आठवण आहे.”

Trail Of The Tiger* या पुस्तकाच्या मराठी अनुवादासाठी ‘दै. सामना’चे जुने संग्रह उपयुक्त ठरल्याचेही त्यांनी सांगितले. “बाळ केशव ठाकरे फोटोबायोग्राफी हा अनमोल ठेवा अभ्यासकांना येथे उपलब्ध होत आहे, ही समाधानाची बाब आहे,” असे त्या म्हणाल्या.यावेळी मा. सुधीरभाऊ जाधव आणि मा. इंद्रजित जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. अंधारे यांनी *जय महाराष्ट्र* चा जयघोष केला.
