कांदा आणि लसणाच्या सालीचे होतात हे जबरदस्त फायदे, वाचून व्हाल अवाक्

0
70

Onion and Garlic Peels Body Benefits: भारतीय स्वयंपाक घरांमध्ये कांदा आणि लसणाचा रोज वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापर केला जातो. वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट वाढवण्याचं काम कांद आणि लसूण करतं.

काही लोक तर कांदा कच्चाही खातात. सामान्यपणे लोक कांदा आणि लसणाच्या साली फेकून देतात. बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की, कांदा आणि लसणाच्या सालीचे आरोग्यालाही, त्वचेला अनेक फायदे होतात.

झाडांसाठी खत

कांदा आणि लसणाच्या सालींचा वापर तुम्ही झाडांसाठी खत म्हणूनही करू शकता. यांपासून तयार केलेलं खत झाडांसाठी चांगलं मानलं जातं. कांदा आणि लसणाच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम, आयर्न आणि मॅग्नेशिअम तसेच कॉपर असतं. यामुळे झाडे हिरवीगार होतात आणि वाढही वेगाने होते.

केस होतात चमकदार

कांद्याच्या सालीने केस चमकदार होतात. कांद्याची साल पाण्यात उकडून हे पाणी केस धुण्यासाठी वापरा. याने केस चमकदार होतात. तेच यांचा वापर डोक्याचे केस रंगवण्यासाठीही केला जातो. कांद्याची साल 1 तास पाण्यात उकडून घ्या. या पाण्याने डोक्याची हलकी मालिश करा. नंतर अर्ध्या तासाने केस धुवा.

क्रॅम्पची समस्या होते दूर

अनेकदा शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये क्रॅम्प येतो. याने लोकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. अशात कांद्याची साल पाण्यात 10 ते 15 मिनिटे भिजवून ठेवा. रात्री झोपण्याआधी हे पाणी प्या. याने मसल्स क्रॅम्पची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.

त्वचेवरील खाज

अनेकदा काही लोकांच्या त्वचेवर खूप खाज येते. यासाठी ते अनेक प्रकारच्या औषधांचा वापरही करतात. पण घरीच कांदे आणि लसणाच्या सालीने ही समस्या लगेच दूर केली जाऊ शकते. पाण्यात भिजवून ठेवलेली कांद्याची आणि लसणाची साल शरीरावर खाज आहे तिथे लावा. याने बराच आराम मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here