Sp9/ कोकरूड प्रतापराव शिंदे
संत्तत्ती हीच खरी संपत्ती आहे असे प्रतिपादन ग्रामीण कथाकार बाबासाहेब परिट यांनी केले. ते कोकरूड ता. शिराळा येथे मातोश्री हिराई देशमुख प्राथमिक व श्री निनाईदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण प्रसंगी बोलत होते.
यावेळी शिवतेज उद्योग समूहाचे संस्थापक अनिलराव देशमुख कोकरुडच्या सरपंच अनिता देशमुख, माजी उपसभापती आनंदराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना बाबासाहेब परिट पुढे म्हणाले की, वारणेच्या खोऱ्यात गुणवत्ता आहे. या गुणवत्तेच्या जोरावर
अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकले आहेत. याच मातीतील आदर्शवत व्यक्तिमत्व स्व. शिवाजीराव देशमुख साहेब यांनी देशाच्या राजकारणात तर प्रशासनात विश्वास नांगरे-पाटील, आनंद पाटील सर्वोच्च पदावर गेली आहेत.
यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा . मातोश्री विद्यालयातील शिक्षकांचे अध्यापनाचे काम चांगले आहे. याप्रसंगी बाबासाहेब परिट यांनी ‘शिकार’ कथा सादर करून उपस्थितांना अंर्तमुख केले. यावेळी निनाईचे संचालक बाजीराव पाटील, उपसरपंच अंकुश नांगरे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष बाजीराव घोडे, बिळाशीचे अभिजित देशमाने, ग्रामपंचायत सदस्य भरत नांगरे, माया सुतार, अंजली वाघमारे, सुभाष सुतार पत्रकार प्रतापराव शिंदे आदींसह मातोश्री विद्यालयातील सर्व शिक्षक स्टाफ , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदा पाटील, प्रास्ताविक मुख्याध्यापक भगवान पाटील तर आभार सुशांत सवदी यांनी मानले.