कोल्हापूर जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील २० हजार ९६१ मतदारांची नोंद झाली 

0
58

कोल्हापूर : निवडणूक आयोगाने राबविलेल्या मतदार पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत व विशेष अभियानामुळे जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील २० हजार ९६१ मतदारांची नोंद झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागातर्फे मतदार यादी अंतिम करण्याचे काम सुरू असून, २२ जानेवारीला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.

या यादीत नाव असलेल्या नागरिकांनाच लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येईल.

यंदाचे वर्ष निवडणुकांचे असल्याने लोकसभा-विधानसभा निवडणुकीचे पडघम आताच वाजू लागले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगानेही गेल्या वर्षभरापासून अचूक मतदार यादी तयार करण्यावर भर दिला आहे.

त्याअंतर्गत सुरू असलेल्या मतदार पुनरिक्षण उपक्रमांतर्गत दुबार, छायाचित्र एकसमान, दोन मतदारसंघांत नाव असलेले, मयत अशा व्यक्तींची नावे वगळली जात आहेत. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार लोकसभेसाठीची अंतिम मतदार यादी ५ जानेवारीला प्रसिद्ध होणार होती. मात्र, त्याला आता मुदतवाढ मिळाली असून, २२ जानेवारीला ही यादी प्रसिद्ध होईल.

जिल्ह्यातील एकूण मतदार

  • पुरुष : १६ लाख ०४ हजार ३७९
  • स्त्री : १५ लाख ४२ हजार ४४३
  • तृतीयपंथी : १७१

कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदार?

विधानसभा : पुरुष : स्त्री : तृतीयपंथी : एकूण

चंदगड : १, ५८, ८४३ : १, ५७, ०३६ : ११ : ३, १५, ८९०
राधानगरी : १, ७२, ०९४ : १, ५९, ९७३ : १४ : ३, ३२, ०८१
कागल : १, ६४, २९० : १, ६२, १४९ : ३ : ३, २६, ४४२
कोल्हापूर दक्षिण : १, ७३, ९८४ : १, ६७, ०७१ : ४४ : ३, ४१, ०९९
करवीर : १, ६१, ४७५ : १, ४८, ०३८ : ० : ३, ९, ५१३
कोल्हापूर उत्तर : १, ४३, ४५९ : १, ४५, २२९ : १७ : २, ८८, ७०५
शाहूवाडी : १, ५१, ३३३ : १, ४१, १६८ : १७ : ३, २८, ७३७
इचलकरंजी : १, ५३, ४४३ : १, ४५, ५०० : ६१ : २, ९९, ००४
शिरोळ : १, ५६, ९०५ : १, ५६, ११२ : १ : ३, १३, ०१८
एकूण : १६, ०४, ३७९ : १५, ४२, ४४३ : १७१ : ३१, ४६, ९९३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here