शिराळा येथे शनिवारी ‘श्रीमंतयोगी’ महानाट्याचे आयोजन

0
73

Sp9/ कोकरूड प्रतापराव शिंदे

शिराळा येथील यशवंत शैक्षणिक, सामाजिक ,सांस्कृतिक मंडळ तसेच यशवंत हॉस्पिटल आणि व्यसनमुक्ती सेंटर यांच्या वतीने शनिवार दिनांक 13 जानेवारी रोजी श्री. छत्रपती क्रीडांगण शिराळा येथे सायंकाळी सहा वाजता अनुमित प्रोडक्शन निर्मित व सुमित डान्स अकॅडमी प्रस्तुत ‘श्रीमंतयोगी ‘ हे शिवजन्म ते शिवराज्याभिषेक सोहळा साकारणारे महानाट्य सादर होणार आहे.

आई जिजाऊंचे संस्कार आपल्या लेकरांना देण्यासाठी आणि शिवरायांचा इतिहास घराघरात पोहोचवण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या महानाट्याचा शिराळा तालुक्यातील लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यशवंत हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. राजाराम पाटील व डॉ. साधना पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here