हिवाळ्यात (Winter Special Recipe) तुम्हाला ताजी कोथिंबीर बाजारात सहज मिळेल या दिवसांत कोथिंबीर स्वस्तही असते. जास्तीची कोथिंबीर आणून तुम्ही पटकन कोथिंबीर वड्या बनवू शकता. (Kothimbir Vadi Recipe Dakhva)अनेकजण पदार्थांवर घातलेली कोथिंबीर बाजूला काढतात किंवा कोथिंबीर न घालता कोणताही पदार्थ खातात.
(Kothimbir Vadi Easy Recipe)कोथिंबीरीचे शरीराला बरेच फायदे मिळतात. (Crispy Kothimbir Vadi) लहान मुलांनी कोथिंबीर खावी यासाठी तुम्ही ही सोपी आयडिया करू शकता. जर तुम्हाला कोथिंबीर वडी तळलेली नको असेल तर तुम्ही वाफवूनही खाऊ शकता किंवा कमी तेलात परतवून घेऊ शकता. (Coriander vadi recipe)
कोथिंबीर वडी करण्याची सोपी पद्धत (How to Make Kothimbir Vadi)
1)कोथिंबीर वडी करण्यासाठी सगळ्यात आधी कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्या. धुतलेल्या कोथिंबीरीतील पाणी निथळून बारीक चिरून घ्या. कोथिंबीर ताजी हिरवी असेल असं पाहा कारण तर पिवळ्या पानांची कोथिंबीर असेल किंवा कोथिंबीरीची पानं काळपट झाली असतील तर कडवट चव येऊ शकते. १ ते २ जुडी कोथिंबीरीचा वापर तुम्ही कोथिंबीर वडीसाठी करू शकता.
2) चिरलेली कोथिंबीर एका वाडग्यात काढून त्यात कपभर बाजरीचे पीठ, अर्धी वाटी रवा, मीठ, हळद, तिखट, ओवा घालून पीठ घट्ट मळून घ्या. यात तुम्ही चण्याचे पीठही घालू शकता.
पण सध्या हिवाळा सुरू असल्यामुळे जर तुम्ही बाजरीचे पीठ यात वापरले तर वडी अधिकच पौष्टीक होईल. बाजरीचे पीठ शरीराला उष्णता टिकवून ठेवते. याशिवाय यात फायबर्सचे प्रमाणही जास्त असते. चण्याचे पीठ वापरल्यामुळे अनेकांना गॅसचा त्रास होतो हे टाळण्यासाठी बाजरीचे किंवा ज्वारीचे पीठ हा उत्तम पर्याय आहे.