LIC ला पुन्हा एकदा झटका, आता आयकर विभागानं बजाबली तब्बल ३५२९ कोटींची नोटीस

0
68

भारतीय आयुर्विमा महामंडळाला (LIC) एकूण 3529 कोटी रुपयांच्या दोन टॅक्स डिमांड नोटिसा मिळाल्या आहेत. आयकर विभागानं एलआयसीला या नोटिसा बजावल्या आहेत. कंपनीने याबाबत शेअर बाजाराला माहिती दिली.

एलआयसीच्या (Life Insurance Corporation of India) म्हणण्यानुसार कर मागणीच्या या नोटिसा सहाय्यक आयकर आयुक्त, मुंबई यांनी जारी केल्या आहेत.

कंपनीकडून 3529 कोटी रुपयांच्या कराची मागणी करण्यात आली आहे. एक नोटीस 2133.67 कोटी रुपयांची आहे आणि ती 2012-13, 2013-14, 2014-15, 2016-17, 2017-18, 2018-19, 2019-20 या मूल्यांकन वर्षांसाठी आहे.

दुसरी नोटीस 1,395.08 कोटी रुपयांची आहे आणि मूल्यांकन वर्ष 2015-16 साठी आहे. नियामक फाइलिंगमध्ये, एलआयसीनं म्हटलं की ते या नोटिसांविरुद्ध आयुक्त (अपील), मुंबई यांच्याकडे निर्धारित वेळेत अपील दाखल करणार आहे. कंपनीच्या आर्थिक, ऑपरेशन्स किंवा इतर कोणत्याही कामांवर या नोटिसांचा कोणताही प्रभाव पडणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

यापूर्वी ४ राज्यांतून जीएसटी नोटीस

अलीकडेच एलआयसीला महाराष्ट्र कर विभागाकडून 806 कोटी रुपयांची जीएसटी डिमांड नोटीस मिळाली होती. यानंतर, कंपनीला तामिळनाडू, गुजरात आणि उत्तराखंड या आणखी तीन राज्यांच्या कर विभागांकडून जीएसटी डिमांट नोटिसा मिळाल्या.

तीन राज्यांनी एलआयसीकडून एकूण 668 कोटी रुपयांची जीएसटी मागणी केली आहे. या रकमेत व्याज आणि दंडाचाही समावेश आहे. LIC नुसार, तामिळनाडूच्या कर प्राधिकरणाकडून 6,634,514,426 रुपये, उत्तराखंडच्या कर प्राधिकरणाकडून 42,818,506 रुपये आणि गुजरातच्या कर प्राधिकरणाकडून 3,939,168 रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here