महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) यांच्या वतीने इयत्ता दहावी अन् बारावी यांची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतली जाणार आहे. यंदा या परीक्षेसाठी झालेल्या विद्यार्थी नोंदणीतून विद्यार्थ्यांची संख्या प्रतिवर्षीच्या तुलनेत वाढली आहे.
याचा अभ्यास राज्य मंडळाकडून करण्यात येत आहे. राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक घोषित केले आहे.
इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत, तर इयत्ता दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे. या परीक्षेसाठी अर्जनोंदणी प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये चालू करण्यात आली.