जेव्हा 18 वर्षांच्या मुलीला घेऊन पळाले होते शक्ती कपूर!

0
123

Shahkti Kapoor Marriage : बॉलिवूडचे क्राइम मास्टर गो गो म्हणजेत शक्ती कपूर यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. शक्ती कपूर आज त्यांच्या लग्नाचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या पत्नीचं नाव शिवांगी कोल्हापुरे आहे.

शिवांगी या 80 च्या दशकात चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री पैकी एक होत्या. शक्ती आणि शिवांगी यांची लव्ह स्टोरी कोणत्याही चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही. कशी त्या दोघांची भेट झाली आणि कसे शक्ती कपूर शिवांगी यांना पळवून घेऊन गेले. चला जाणून घेऊया शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापुरे यांची फिल्मी लव्ह स्टोरी.

शक्ती आणि शिवांगी यांनी 1982 मध्ये लग्न केलं. त्यावेळी शिवांगी या फक्त 18 वर्षांच्या होत्या. शिवांगी कोल्हापुरे या 80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या.

शिवांगी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ही ‘किस्मत’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती आणि रंजीता मुख्य भूमिकेत होत्या. शक्ती कपूर यांनी देखील या चित्रपटात काम केले होते. दोघांची पहिली भेट ही याच चित्रपटाच्या सेचवर झाली होती. शक्ती आणि शिवांगी यांना याविषयी थोडीही कल्पना नव्हती की या चित्रपटानंतर त्यांचं आयुष्य बदलेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here