Skin Care Tips : फिटनेस डाएटबरोबरच सध्या ब्युटी डाएटचा ट्रेंड; काय आहे नेमकं हे ‘ब्युटी डाएट’?

0
70

Skin Care Tips : निरोगी शरीर जर हवं असेल तर त्यासाठी निरोगी आहार घेणं गरजेचं आहे. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का आपण जे काही खातो त्याचा परिणाम आपल्या त्वचेवरही (Skin Care Tips)दिसून येतो.

यासाठीच शारीरिक आरोग्याबरोबरच आपल्या त्वचेची देखील काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. आपली त्वचा जर सुंदर हवी असेल तर त्यासाठी विशेष आहाराचं पालन करणं महत्त्वाचं आहे. यासाठीच लोक आजकाल ब्युटी डाएट फॉलो करतायत. आता हे ब्युटी डाएट म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर याच संदर्भात अधिक माहिती पाहूयात.

ब्युटी डाएट म्हणजे काय?

ब्युटी डाएट म्हणजे आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं डाएट फॉलो केलं जातं. यामध्ये हेल्दी पदार्थांचं सेवन करण्यावर भर दिला जातो. तसेच, या पदार्थांत व्हिटॅमिन्सचा (Vitamin)देखील तितकाच सहभाग आहे त्यामुळे या डाएटला ब्युटी डाएट म्हटलं जातं. यामुळे आपली त्वचा सॉफ्ट, तजेलदार आणि सुंदर दिसू लागते. त्वचेला अधिक उजळ आणि लवचिक बनविण्यासाठी हे डाएट फॉलो केलं जातं.

व्हिटॅमिन ए

व्हिटॅमिन ए त्वचेसाठी खूप महत्वाचं आहे. या व्हिटॅमिनमध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील मुबलक प्रमाणात आढळतात, ज्याच्या मदतीने त्वचेच्या पेशी निरोगी राहतात. याशिवाय ते त्वचेसाठी कोलेजन तयार करण्याचे काम करतात. तुमच्या आहारात गाजर, हिरव्या भाज्या, रताळे, अंडी, आंबा आणि टोमॅटो यांचा समावेश करा.

व्हिटॅमिन बी 5

व्हिटॅमिन बी 5 देखील त्वचेसाठी खूप महत्वाचे आहे. जर व्हिटॅमिन बी 5 चांगले असेल तर त्वचेवर पिंपल्सची समस्या उद्भवत नाही. व्हिटॅमिन बी 5 चे प्रमाण शरीरात योग्य असल्यास, उपचार प्रक्रिया खूप जलद गतीने होते. त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यातही ते महत्त्वाची भूमिका बजावते. तुमच्या आहारात दूध, मशरूम, शेंगदाणे, सूर्यफुलाच्या बिया आणि दही खाण्यास सुरुवात करा.

व्हिटॅमिन सी

हे केवळ रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर काळे डाग आणि पिगमेंटेशन सारख्या समस्या उद्भवू शकतात. हे व्हिटॅमिन सूर्यापासून होणारे नुकसान आणि चमकदार त्वचेसाठी खूप महत्वाचे आहे. संत्री, द्राक्षे, किवी, लिंबू, पपई आणि स्ट्रॉबेरी इत्यादींचा आहारात समावेश करा.

व्हिटॅमिन डी

जर काही कारणास्तव तुमची स्किन टॅन झाली असेल तर तुमच्या आहारात व्हिटॅमिन डीचा समावेश करा. यासाठी मासे, दही आणि लोणी हे सर्व व्हिटॅमिन डीचे चांगले स्रोत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here