Whatsapp Feature Update For iphone :आता आयफोन युजर्सना येणार मज्जा! व्हॉट्सॲप घेऊन आलंय कमाल स्टिकर्स फिचर, 3 स्टेप्स वापरा अन् मित्रांसोबत मजेशीर चॅटिंग करा!

0
95

Whatsapp Feature Update For iphone : व्हॉट्सॲप आपल्या (Whatsapp) युजर्सना अधिक चांगला एक्सपेरियंस मिळण्यासाठी नवनवीन फिचर्स रोल आउट करत राहते. आता मेटाने आयफोन युजर्ससाठी एक नवीन फिचर आणलेला आहे.

हा फिचर आल्यानंतर युजर्स व्हॉट्सॲप वर स्वतः स्टीकर्स क्रिएट करू शकतात आणि त्यांना एडिटपण करू शकतात. यामुळे युजर्सचा चॅटिंग एक्स्पिरियन्स खूप मजेदार होणार आहे. आता हे स्टिकर नक्की कसे तयार करायचे आहे त्यांचा वापर कसा करायचा हा प्रश्न तुम्हाला देखील पडलाय का? चला तर जाणून घेऊया या भन्नाट फिचर…

हे फिचर सध्यातरी फक्त आयफोन युजरसाठी रोल आउट करण्यात आला आहे. युजर्सच्या चॅटिंग एक्स्पिरियन्सला मजेदार बनवण्यासाठी याची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये युजर्स नवीन स्टीकर्स तयार करू शकतात आणि जुन्या स्टीकर्सना एडिट सुद्धा करू शकतातआणि विशेष गोष्ट ही की हे काम कोणत्याही थर्ड पार्टी ॲप शिवाय करता येऊ शकणार आहे. एवढेच नव्हे तर हे स्टिकर्स तयार करताना युजर्सना ॲप लीव करण्याची देखील गरज नाही. असं म्हटलं जातं की हा फिचर व्हॉट्सॲप वेब यूजरसाठी सुद्धा रोल आउट करण्यात येणार आहे.

ॲप वापरण्याची पद्धत

या फिचरमध्ये युजर्सना ऑटो क्रॉप फंक्शन, एडिटिंग टूल आणि ड्रॉइंग करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये युजर्स एखादा स्टिकर स्वतः बनवू शकतात किंवा एखाद्या जुन्या स्टिकर्सला स्वतः कस्टमाईज करू शकतात.हा फिचर युज करण्यासाठी युजर्सना खालील स्टेप फॉलो करावा लागतील –

स्टेप 1-व्हॉट्सॲप मध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्टिकर्स ट्रे या सेक्शनमध्ये तुम्हाला जावं लागेल. इथे सिलेक्ट या ऑप्शन वर क्लिक करा आणि नंतर क्रिएट स्टिकर वर क्लिक करा.

स्टेप 2-या स्टेप मध्ये गॅलरी मधून तुम्ही कोणताही फोटो सिलेक्ट करू शकता. नंतर तो फोटो तुमच्या हिशोबाने कस्टमाइज करा आणि परत सेंड करा.

स्टेप 3-ही प्रोसेस तशीच फॉलो करून आता फोटो एडिट करा. आता तुमचा स्टिकर तयार झालेला असेल.

अवघ्या तीन स्टेपमध्ये तुम्ही तुमचा स्टिकर तयार करू शकता. आयफोनमध्ये आलेला हा नवीन फिचर तुम्हाला तुमचा चॅटिंग एक्सपिरीयन्स वाढवण्यास खूप मदत करणार आहे. या फिचरचा वापर करून तुम्ही अनेक मिम्स तयार करू शकता. किंवा एखाद्या मित्राचा, नातेवाईकांचा, प्राण्यांचे ,पक्षांचे असे वेगवेगळे विनोदी स्टिकर्स देखील तयार करू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here