प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा.
पुणे : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. प्रभा अत्रे यांना आज पहाटे झोपेत ह्रदयविकाराचा झटका आला.
त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली निधन होती. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर सोमवार दि १५ जानेवारी रोजी अंत्यसंस्कार केले जातील.
दोनच वर्षांपूर्वी कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.दुर्दैवी गोष्ट म्हणजे आज १३ जानेवारी रोजी मुंबईत त्यांचा कार्यक्रम ठरला होता.
यासाठी त्या मुंबईला येणार होत्या, मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.स्वरयोगिनी , संगीत विचारवंत , लेखिका अशी बहुआयामी ओळख असलेल्या डॉ. प्रभा अत्रे या किराणा घराण्याच्या बुजुर्ग गायिका होत्या.
त्या पं. सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या होत्या. केंद्र सरकारने त्यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल १९९० मध्ये पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. २०२२ मध्ये पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. अत्रे यांना संगीत नाटक अकादमी तसेच पुण्यभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अत्रे यांची संगीता संबंधित अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.