सांगली : १४ जानेवारी रोजी संक्रांती निमित्त सरपंच, उप सरपंच आणि ग्रामस्थ यांनी महिला आणि बालक यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी आरोग्य शिबिर आयोजित केले होते. डॉ फैयाज शिकलगार आणि डॉ सौ तबसुम शिकलगार (मॉम हॉस्पिटल सांगली )या दोन प्रख्यात तज्ञ डॉक्टरांनी तपासणी आणि मार्गदर्शन केले. स्थानिक माता आणि बालक यांनी मोठ्या प्रमाणावर हजर राहून याचा लाभ घेतला.
महिलांचे वेगवेगळे दुर्लक्ष केले जाणारे आजार तसेच बालकांच्या वाढीसाठी विशेष सल्ला देण्यात आला. त्याप्रमाणे मोफत रक्त तपासणी आणि आवश्यक औषधे वाटण्यात आली. कोपिअस हेल्थकेअर यांचेतर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायतीचे उत्कृष्ट नियोजन तसेच कर्नाळ आरोग्य उपकेंद्र यांचे विशेष सहकार्य मिळाल्यामुळे हे शिबिर यशस्वी आणि सोयीस्कर झाले असे डॉ शिकलगार यांनी आवर्जून सांगितले. तसेच ह्या प्रकारच्या वैद्यकीय शिबिरामध्ये सार्वजनिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल, आणि स्थानिक डॉ पुढे येण्याची गरज आहे , असे उपसरपंच म्हणाले. त्याप्रमाणे साथी चे रोग टाळण्यासाठी या प्रकारच्या आरोग्य शिबिरातून शिकवण पण मिळेल असे सरपंच यांनी विशेष नमूद केले.शिबिर यशस्वी करण्यात युवराज पाटील, नासीर चौगुले आणि रोहन एडके यांनी विशेष पुढाकार घेतला