राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव समितीतर्फे जिजाऊं जयंती साजरी

0
63

प्रतिनिधी : प्राध्यापिका मेघा पाटील

हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी राजमाता जिजाऊंचे छत्रपती शिवरायांना मार्गदर्शन व प्रेरणा अत्यंत महत्त्वाची होती.राजमाता जिजाऊंच्या संस्कारामुळेच छत्रपती शिवराय घडले असे मनोगत अॅड. धनंजय पठाडे यांनी व्यक्त केले. राजमाता जिजाऊंच्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. राजमाता जिजाऊंचे जीवन कार्य या विषयावर प्रा.डाॅ. शरद गायकवाड यांचे व्याख्यान झाले.

राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव समितीतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंतांना राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषदेचे सचिन पाटणकर,डाॅ प्राजक्ता सूर्यवंशी, शिरोली ग्रामपंचायत सदस्य शक्ती यादव, कृष्णा कांबळे, महेश पोरे, अनिता हजारे, नागेश देशमुख, नामदेव नागटिळे यांना राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले याप्रसंगी राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर जिल्हा अधीक्षक रवींद्र आवळे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव,समितीचे अध्यक्ष अमोल कुरणे, निवास सूर्यवंशी, मनीषा घुणकीकर, राज कुरणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील सामंत यांनी केले तर आभार संयोजक अमोल कांबळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here