कोल्हापूर – जिल्हा शासकीय रुग्णालयात भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख यांना जिजाऊ जयंती समितीच्या वतीने राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि दोघानी संयुक्तपणे शायरन फिचर्सच्या आरोग्य दिनदर्शिका 2020 चे प्रकाशन ही केले .
प्रारंभी सर्वांचे स्वागत करताना आरोग्य दिनदर्शिकेचे पत्रकार -आरोग्य सेवक राजेंद मकोटे यांनी ‘ कोल्हापूर आता मेडिकल हब म्हणून स्थिरावत असून मुख्य द्वारे सिंधुदुर्ग – रत्नागिरीची सर्व पेंशट उपचारासाठी पुणे मुंबई ऐवजी आता कोल्हापुरात प्राधान्य देत आहेत
या पार्श्वभूमीवर त्यांना अधिकाधिक माहिती योग्य वेळ मिळावीतसेच परगावच्या रुग्णांच्या नातेवाईकांची सोय हवी यासाठी सर्वांनी आग्रही राहावे , अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांना सर्व सुविधा कमी वेळेत आणि कमी मनुष्यबाळात मिळाव्यात यासाठी ही आरोग्य दिनदर्शिका अधिक मोलाची ठरेल असा आशावाद सर्वाचे स्वागत करताना व्यक्त केला .
‘ विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या समन्वयाने कोल्हापुरातील परगावहून उपचारार्थ येणारे रुग्ण नाही करणार अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळावी यासाठी कार्यरत राहू या भाजपाचे विजय जाधव यांनी नमूद केले .
सीएस डॉक्टर सुप्रिया देशमुख यांनी या पुरस्काराने आपल्या काम करताना अधिक उत्साह मिळाल्याचेही मिळत असल्याचे सांगितले .पुरस्कार समन्वयक अमोल कुरणे यांनी यावेळी सर्वांचे आभार आभार मानत सीपीआर विषयी सर्वच घटकांनी सामान्य जनतेच्या मनात असलेला थोरला दवाखाना हा विश्वास आपल्या सेवा करण्यातून जपावा असे आवाहन केले .
यावेळी डॉक्टर सरिता थोरात ,डॉक्टर संजय रणवीर , डॅप्क्यु च्या दीपा शिपूरकर यांच्यासह सुजय जाधव , दिग्दर्शक सागर ठाणेकर , जैन संघटनेचे राजेंद्र पाटील , डीटीसी चे अभिजीत वायचळ , संजय पाटील , विशाल मिरजकर निवेदिका सीमा मकोटे , मनिषा माने , शिल्पा अष्टेकर सर विविध मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते . सीपीआर च्या विविध सेवा विभागात या ही दिनदर्शिका वितरित करण्यात आली