आई अंबाबाईच्या वास्तव्याने पुनीत झालेले कोल्हापूर हे महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य पर्यटन स्थळ आहे तसेच दक्षिण काशी अशी त्याची ओळख आहे

0
140

कोल्हापूर आई अंबाबाईच्या वास्तव्याने पुनीत झालेले कोल्हापूर हे महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य पर्यटन स्थळ आहे तसेच दक्षिण काशी अशी त्याची ओळख आहे. कोल्हापूर ला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात.

नुकतेच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखो भाविक आई अंबाबाईच्या दर्शनासाठी आले होते. कोल्हापूरला येणाऱ्या पर्यटकाच्या भेटी देण्याच्या स्थानिक स्थळाच्या यादीत रंकाळा तलाव व परिसर हा सर्वप्रथम स्थानकावर असतो.

रंकाळा तलाव येथील चौपाटी, खाऊगल्ली, शालिनी पॅलेस आणि नौकाविहार साठी पर्यटकांची रीघ लागलेली असते. परंतु चौपाटीवर फिरताना पर्यटकांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते, विशेषतः सूर्यास्तानंतर.

रंकाळा टॉवर ते शालिनी पॅलेस दरम्यान असलेल्या चौपाटीवर आणि तलवार चौक ते अंबाई टॅंक पर्यत असलेल्या जॉगिंग ट्रॅकवर सुयोग्य प्रकाश योजना नसल्याने पर्यटकांना अंधारात मोबाईलच्या प्रकाशात चाचपडत चालावे लागते.

कोल्हापूर महानगरपालिकेने तलावाच्या तीरावर ठराविक अंतरावर विधुत दिव्याची सोय केल्यास ते पर्यटकांना लाभदायक होईलच. तसेच किनाऱ्याच्या वक्राकार आकार लक्षात घेता रंकाळा चौपाटी ही कोल्हापूरची “मरिन ड्राइव्ह” अर्थात “ताराराणीचा रत्नहार” म्हणूनही ओळखला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here