जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट प्रोत्साहन पर लाभ त्वरीत द्यामनसेचे तालुकाध्यक्ष अशोक पाटील

0
73

राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजनेअंतर्गत
कोल्हापूर जिल्हयामध्ये प्रोत्साहन पर अनुदान लाभार्थ्यांची संख्या ३ लाखांच्यावर असताना आपल्या तालुक्यातील आजवर सुमारे हजारो, अधिक शेतकरी या लाभापासून आजही वंचित आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या गळचेपी धोरणामुळे केवळ लाभ जाहीर करायचा. मात्र प्रत्यक्षात कमी शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी घालून दिलेल्या जाचक अटी त्वरीत रद्द करून कर्ज घेऊन नियमित परतफेड केलेल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट प्रोत्साहन पर लाभ मिळावा.

या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भुदरगड तहसिल कार्यातील तहसिलदार याना या मागणी चे निवेदन देण्यात आले.
कोल्हापूर जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदानाचा सरसकट लाभ त्वरीत मिळवून द्यावा अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यातआला.


यावेळी मनसेतालुका अध्यक्ष अशोक पाटील तालुका महिला अध्यक्ष सौ सुनीता परीट जिल्हा उपाध्यक्ष अमोल चव्हाण शहर उपाध्यक्ष चंद्रकांत ये सा दे शाखाप्रमुख उत्तम पाटील विभाग प्रमुख सुनील पाटील मारुती सारंग व मनसेचे कार्यकते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here