प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर : स्वातंत्र्य चळवळीत कोल्हापूर जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. यशवंतराव चव्हाण, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार, पी.बी.पाटील यांच्यासह अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात लाट्या खाल्या, तुरुंगवास भोगला, आंदोलनाच्या झळा सोसल्या.
त्यामुळे आज आपल्याला आनंदाचे दिवस आले आहेत. स्वातंत्र्यलढ्याची माहिती घेत असताना देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार व पी.बी.पाटील यांचे नाव घेतल्याशिवाय पुर्ण होणार नाही.
त्यामुळे देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार व पी.बी. पाटील यांचे विचार चिंरतर ठेवण्यासाठी आपण सर्वानी घेतलेला पुढाकार हा महत्वाचा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.
निमशिरगांव ता.शिरोळ येथे स्वातंत्र्यसेनानी पी.बी.पाटील निमशिरगांव वि.का.स.सेवा सोसायटी नामकरण व स्वातंत्र्यसेनानी साहित्यिक स्व. पी.बी.पाटील महसुल भवन इमारत पायाखुदाई कार्यक्रम राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी शरद पवार बोलत होते.यावेळी शरद पवार पुढे म्हणाले,एका छोट्या निमशिरगांव गावातून रत्नाप्पाण्णा कुंभार व पी.बी. पाटील यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. हे आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.
देश आण्णा मंत्रीमंडळात असताना मी अनुभव घेतला आहे. त्यांना कुणीही प्रश्न विचारला तर आण्णा अचूक माहिती देत होते. आता स्वातंत्र्यनंतर आपण विकासाकडे जात असताना स्व.कुंभार,सा.रे.पाटील, दत्ताजीराव कदम,शामराव पाटील यड्रावकर,पी.बी.पाटील यांचे योगदान आपल्याला विसरता येणार नाही.रत्नाप्पाण्णांच्या स्मारकासाठी सरकारने ५ कोटी दिले आहे.
मात्र त्यासाठी अजून निधी हवा आहे,तो राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी उपलब्ध करावा. पंचगंगा कारखान्यानेही टनाला २०० रुपये देत आहेत. त्यामुळे आण्णांचं स्मारक भव्य उभारले पाहिजे यांची व्यवस्था करा.
आणि त्यांचे विचार तेवत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले.
स्वागत सरपंच अश्विनी गुरव तर प्रास्ताविक पद्माकर पाटील यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्वाचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील,माजी आमदार राजीव आवळे, दलितमित्र डॉ.अशोकराव माने, शरद पवार, पृथ्वीराज यादव, तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे, चंद्रकांत जाधव घुणकीकर, महावीर पाटील, कलगोंडा पाटील, स्वस्तिक पाटील, सुप्रिया सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. आभार अजित सुतार यांनी मानले.