…तर ‘हनुमान’ फेम अभिनेत्याने गमावला असता डोळा, सांगितला शूटिंगदरम्यानचा थरारक प्रसंग

0
119

सध्या बॉक्स ऑफिसवर ‘हनुमान’ या दाक्षिणात्य सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. जिकडेतिकडे केवळ ‘हनुमान’ सिनेमाची चर्चा होताना दिसत आहे. या सिनेमाची कथा आणि त्यातील व्हीएफएक्स पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत.

‘हनुमान’ सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या दाक्षिणात्य अभिनेता तेजा सज्जाच्या अभिनयाचंही सर्वत्र कौतुक होत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तेजाने ‘हनुमान’ सिनेमाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला. शूटिंगदरम्यान एका डोळ्याला दुखापत झाल्याचंही तेजाने सांगितलं.

‘हनुमान’ चित्रपटातील भूमिकेमुळे तेजा सज्जा प्रसिद्धीझोतात आला आहे. ‘झूम टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत तेजाने सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा प्रसंग सांगितला. तो म्हणाला, “या भूमिकेसाठी मी लाल रंगाच्या लेन्सचा वापर केला होता. त्यामुळे माझ्या एका डोळ्याच्या कॉर्नियाला दुखापत झाली. शूटिंगच्या ठिकाणी खूप धूळ आणि छोटे दगडही होते. ज्यामुळे डोळ्यांचं नुकसान होऊ शकत होतं. हे खूप वेदनादायी होतं. मला माझ्या डोळ्यांची सर्जरी करावी लागली.”

प्रशांत वर्मा यांचं दिग्दर्शन असलेला ‘हनुमान’ हा एक तेलुगु सिनेमा आहे. १२ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमाने अवघ्या काही दिवसांतच बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. सिनेमागृहात हनुमानचे शो हाऊसफूल होत आहेत. या सिनेमात तेजा सज्जा, अमृता अय्यर, दीपक शेट्टी, विनय राय अशी स्टारकास्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here