गाडीला मनपसंत नंबर हवाय? आठवडाभर थांबाआरटीओकडे आता करता येणार ऑनलाइन बुकिंग

0
120

 आपल्या लाडक्या गाडीला लकी नंबर मिळावा यासाठी अनेक वाहनधारक उत्सुक असतात. त्यासाठी प्रसंगी चार पैसे जास्तीचे मोजायचीही त्यांची तयारी असते. म्हणूनच प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडे (आरटीओ) अशा मनपसंत क्रमांकांसाठी आर्जवे केली जातात.

आरटीओही मग अधिकचे शुल्क घेऊन वाहनधारकांना त्यांच्या पसंतीचा नंबर देत असते. आता ही सोय ऑनलाइन होणार आहे. आपल्या आवडीचा क्रमांक गाडीला मिळावा यासाठी वाहनधारकांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. पुढच्या आठवड्यापासून ही सेवा सुरू होत आहे. राज्यातील विविध आरटीओ कार्यालयात दररोज आठ- दहा हजार नवीन वाहनांची नोंदणी केली जाते.

मुंबईकरांची विविध नंबरला पसंती
वाहनधारकांचा ९, ९९, ९९९, ९९९९, ७८६, ८०५५ अशा विविध नंबरकडेही ओढा दिसतो. अनेक जण जन्मतारीख, आपल्या पूर्वीच्या वाहनाचा क्रमांक घेण्यासही प्राधान्य देतात. सर्वसामान्य वाहनधारकांकडून १५ ते ५० हजारांदरम्यान शुल्क असलेला नंबर घेण्यास प्राधान्य दिले जाते.

 अनेक जण व्हीआयपी नोंदणी क्रमांकासाठी प्रयत्नशील असतात, तसेच पाच हजार रुपयांपासून १२ लाखांपर्यंत आरटीओकडून शुल्क आकारणी केली जात. त्यामुळे परिवहन विभागाला मोठा महसूल मिळत आहे. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आरटीओने आपल्या पसंतीचा नोंदणी क्रमांक वाहनधारकांना देण्याची प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला असून त्याची सुरुवात आठवडाभरात होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना घरबसल्या व्हीआयपी नंबर बुक करता येणार आहे. यामाध्यमातून परिवहन विभागाला मिळणाऱ्या महसुलात मोठी वाढ होणार असल्याची माहिती आरटीओ अधिकाऱ्याने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here