Interesting Fact: JCB मशीनचा रंग पिवळाच का असतो तुम्हाला माहिती आहे का?

0
67

 रस्त्यावरील डेब्रिज हटवताना, इमारतीचे तोडकाम करताना, रस्त्यावर खोदकाम करताना अशा विविध कामांसाठी जेसीबीचा वापर केला जातो. अनेकदा बेकायदा बांधकामांवर तोडकामासाठी जेसीबीचा वापर केला जातो.

पिवळ्या रंगाची असलेली ही जेसीबी अवघ्या काही मिनिटांत भलीमोठी इमारत उद्धवस्त करु शकते. पण जेसीबीचा रंग पिवळाच का असतो बरं? हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? तसेच जेसीबीचे खरे नाव काय? जाणून घेऊयात यासारख्या प्रश्नांची उत्तरे…

जेसीबीचे खरे नाव काय? (What is the real name of JCB)

खोदकाम किंवा तोडकाम करणाऱ्या मशीनला आपण जेसीबी म्हणतो. पण याचे नाव जेसीबी नाही तर हे मशीन बनवणाऱ्या कंपनीचे नाव जेसीबी आहे. तर या मशीनचे नाव ‘बॅकहो लोडर’ असे आहे. 1953 मध्ये जेसीबी कंपनीने पहिले बॅकहो लोडर तयार केले. यापूर्वी 1945 मध्ये याचे एक मॉडेल बनवण्यात आले होते. पण यात बदल करण्यात आले. त्यानंतर 1953 मध्ये ही मशीन बनवली तेव्हा त्याचा रंग निळा आणि लाल होता.

पिवळा रंग का?

JCB म्हणजेच बॅकहो लोडर या मशीनचा रंग पिवळा असतो. या मशीनला पिवळा रंग देण्याची सुरुवात 1964 पासून झाली. या मशीनला पिवळा रंग देण्याच्या मागे सुरक्षेच्या संबंधित कारण आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी रात्री सुद्धा अनेकदा काम सुरू असते. अशा परिस्थितीत या मशीनची दृश्यमानता टिकवून ठेवण्यासाठी आणि कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून या मशीनला पिवळा रंग देण्यात आला आहे.

पिवळा रंग हा दूरुवरुन सहजपणे दिसतो. इतर रंगांच्या तुलनेत पिवळा रंग सहजपणे दिसतो. यामुळेच जेसीबीचा रंग पिवळा असतो. केवळ जेसीबी मशीनच नाही तर इतर मशीन्स म्हणजेच क्रेन सुद्धा पिवळ्या रंगाच्या असल्याचं आपल्याला पहायला मिळतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here