उज्वला लाड :-आंबा प्रतिनिधी
समस्त हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मस्थळी अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा व मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम 22 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
त्यानिमित्त संपूर्ण देशभर गावोगावी अमृत कलश पूजन व अक्षता पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण देशभर हिंदू बांधवांनी भक्तिमय वातावरणात आपापल्या गावी यथोचित कार्यक्रमाचे आयोजन करून प्रभू रामचंद्रांना वंदन केले.
या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळ आंबा येथे वाणी पेठ येथील समर्थ साई गजानन मंडळ या मंडळातर्फे हनुमान मंदिराच्या प्रांगणात अमृत कलश पूजन , श्रीरामांच्या प्रतिमेची पूजन व अक्षता पूजन करण्यात आले.
भक्तिमय वातावरणात सर्व नागरिक व महिलावर्ग मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
श्रीरामांच्या प्रतिमेची पूजन व आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले. मिरवणुकीने अमृत कलश वाणी पेठेतून हनुमान मंदिराच्या प्रांगणात आणण्यात आला. श्रीरामांच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते.
अशाप्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला.