रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व कोल्हापूर जिल्ह्याचा बुलंद आवाज मानला जाणाऱ्या उत्तमदादा कांबळे यांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा करू असा निर्धार शासकीय विश्रामगृह कोल्हापूर या ठिकाणी जिल्हा, तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपले मत मांडत असताना सांगितले की, आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी पॅंथर चळवळीपासून कार्यरत असणारे उत्तमदादा कांबळे यांनी कोल्हापुरात विचार कार्य आणि न्यायाच्या भूमिकेचा नेहमीच झंजावात केला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवराय, फुले, शाहू, अण्णाभाऊंना आपले दैवत मानून विचारांची क्रांती चळवळीचा सच्चा कार्यकर्ता करू शकतो. हे दाखवून दिले. प्रस्थापितांना न घाबरता भारतीय संविधानाचा आधार घेत यांनी आलेल्या प्रत्येक बहुजन माणसाला न्याय देण्याचं काम केलं.
म्हणूनच आज हजारो कार्यकर्त्यांची फौज उत्तम दादांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे अशा या दादांचा वाढदिवस येत्या 5 फेब्रुवारीला वैचारिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा विविध सामाजिक उपक्रम.
म्हणजेच अन्नदान, सीपीआर येथे फळे वाटप, विविध सांस्कृतिक व वैचारिक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा असे विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. हा वाढदिवस कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकात होणार आहे . या बैठकीचे अध्यक्षस्थानी भुदरगड तालुकाध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते नामदेवराव कांबळे हे होते.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडळीकर, जिल्हा संघटक राजेंद्र ठीकपुर्लीकर, कामगार आघाडी प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटिळे, हुपरी नगर परिषदेचे मा.उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे, करवीर तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाशीकर, गगनबावडा तालुकाध्यक्ष तानाजी कांबळे, शिरोळ तालुकाध्यक्ष जयपाल कांबळे, गगनबावडा पंचायत समितीचे मा.सभापती बंकट थोडगे, शाहुवाडी तालुकाध्यक्ष विश्वास सरूडकर, शहराध्यक्ष सुखदेव बुद्धाळकर, हातकणंगले तालुकाध्यक्ष अविनाश अंबपकर, ज्येष्ठ नेते मधुकर कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीला कामगार आघाडी शहराध्यक्ष प्रदीप मस्के, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कांबळे, युवा आघाडी शहराध्यक्ष किरण निकाळजे,गडहिंग्लज तालुकाध्यक्ष दिलीप कांबळे , जिल्हा सचिव सोरटे आण्णा,अतुल सडोलीकर, प्रज्योत सूर्यवंशी, अमित कांबळे, सुभाष कांबळे, संतोष कांबळे, आंबेवाडी उपसरपंच सचिन कोणवडेकर , गजेंद्र कांबळे, गणेश कावणेकर, यश कांबळे, आशिष कांबळे, जॉकी पाडळीकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.