Fact Check : अयोध्येतील नवीन राम मंदिरात 500 वर्षांची प्रतीक्षा संपली. कौशल्येचा राम भव्यदिव्य अशा सुरेख मंदिरात विराजमान झाला. बालरुपातील रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा सोहळा अख्खा जगाने अनुभवला.
कोणी प्रत्यक्षात जाऊन तर कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक जण या ऐतिहासिक क्षणाचा साक्षिदार झाला. अख्खा देश जय श्री रामाच्या जयघोषाने दुमदुमला. 22 जानेवारी 2024 हा दिवस ऐतिहासिक ठरला असून अख्खा देशात रामदिवाळी साजरी झाली. आपल्या लाडक्या रामाच्या स्वागतासाठी प्रत्येक जण आपल्यापरीने योगदान देत होता. (If Latadidi were today how would she have sung Ram Aayenge You will be mesmerized by listening to AI VIRAL VIDEO Fact Check)
‘राम आयेंगे तो…’
श्रीरामावर अनेक भजन आणि गाणी आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक भजन तुफान व्हायरल झालं. प्रत्येकाच्या ओठांवर हे भजन होतं, अगदी सोशल मीडियावरील रिल्स आणि घराघरात हे भजन ऐकू येतं आहे. ते म्हणजे स्वाती मिश्रा यांनी गायलेलं ‘राम आयेंगे तो अंगना सजाऊंगी’. हे भजन ऐकल्यावर प्रत्येक जण उत्साहाने रामाच्या स्वागतात मुग्ध होतो. तुम्ही कधी विचार केला का? जर आज लतादीदी आपल्यामध्ये असत्या आणि त्यांच्या आवाज हे भजन असतं तर…दीदींना आपण गानकोकिळा म्हणतो. त्यांच्या आवाजातील असंख्य गाणी ऐकून आजही आपण हरपून जातो. त्यांच्या आवाजाची जादू आजही आपल्या नसानसावर करते. अशात जर हे भजन त्यांच्या आवाजात ऐकता आलं असतं तर…
तुमची ही इच्छा पूर्ण झाली आहे. कारण सोशल मीडियावर लतादीदींच्या आवाजातील हे भजन व्हायरल झालं आहे. हे गाणं ऐकून तुम्हाला नक्की वाटेल की हे स्वर कोकिळा लतादीदींनी गायलं आहे. पण थांबा ही कमाल केली आहे AI ने. हा व्हिडीओ AI चा असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. कोणी म्हणणार पण नाही की हे भजन लतादीदींनी गायलं नाही तर हा एक AI व्हिडीओ आहे म्हणून…
पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आठवल्यात लतादीदी
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांचं एक भजन सोशल मीडियावर शेअर केलं होतं. त्यावेळी या व्हिडीओला मोदींनी कॅप्शन देताना लिहिलं की, ‘रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला त्यांची उणीव भासतेय.’ दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील Ranvijay Singh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.