“.ह्या गोष्टीपासून कायम लांब पळत गेलो”; सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट चर्चेत

0
37

Siddharth Chandekar : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर लवकरच ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री सई ताम्हणकर देखील झळकणार आहे.

नुकतेच त्याने ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटातील फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोबत त्याने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सिद्धार्थ चांदेकर याने इंस्टाग्रामवर श्रीदेवी प्रसन्न चित्रपटातील फोटो शेअर करत लिहिले की, “तुमच्या भीतीवर मात करण्यासाठी पहिले पाऊल. नाच ह्या गोष्टीपासून कायम लांब पळत गेलो. कधीच जमणार नाही असं वाटायचं.

आता कुठे जरा आत्मविश्वास आला आहे. आता पळणार नाही, खूप नाचणार. ही संधी दिल्याबद्दल टीप्स मराठीचे आभार मानतो. माझ्यातील बेस्ट पप्पू मलूने बाहेर काढले. क्राईममध्ये भागीदार झाल्याबद्दल सई ताम्हणकरचे आभार मानेन तेवढी कमीच आहे आणि या उत्कृष्ट कृतीसाठी रितेश देशमुख आणि श्रेयस तळपदे यांना ट्रिब्युट. तुमच्या भावनांशी कोणीही बरोबरी करू शकत नाही, तुमचा आदर दाखवण्याचा माझा हा नम्र प्रयत्न आहे.”

काही दिवसांपूर्वीच सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटातील ‘दिल मे बजी गिटार’ हे गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटातील हे धमाल बॉलिवूड स्टाईल गाणे सई आणि सिद्धार्थवर चित्रित झालं असले तरी गाण्याच्या शेवटच्या कडव्यात श्रेयस तळपदेचीही एन्ट्री होते. या गाण्याला प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यातून सई आणि श्रेयसची केमिस्ट्री पुन्हा एकदा बघायला मिळत आहे.

विशाल विमल मोढवे यांनी ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर अमित राज यांनी संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. पुढील महिन्यात 2 फेब्रुवारी रोजी ‘श्रीदेवी प्रसन्न’ सिनेमा रिलीज होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here