FD करण्याचा विचार करताय? ही आहे बेस्ट इंट्रेस्ट देणाऱ्या 20 बँकांची लिस्ट

0
50

: फिक्स डिपॉझिट हे आपल्याला निश्चित रिटर्न देते. यामध्ये कोणतीही जोखिम नसते. याच कारणामुळे भारतात गुंतवणुकीसाठी एफडी हा लोकप्रिय पर्याय बनला आहे. यासोबतच फिक्स डिपॉझिट हे तुमच्या आपत्कालिन गरजा पूर्ण करणे आणि रियाटरमेंटनंतरही उत्पन्नाचं एक स्त्रोत बनते.

याच कारणामुळे लोक फिक्स डिपॉझिटला प्राधान्य देतात. तुम्हीही एफडी करण्याचा विचार करत असाल आणि यासाठी चांगले रिटर्न देणारी बँक शोधत असाल. तर आज आपण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. येथे आपण बेस्ट रिटर्न देणाऱ्या 20 बँकांची यादी आणि त्यांचे रेट पाहणार आहोत. दरम्यान स्मॉल फायनान्स बँका या सर्वाधिक इंट्रेस्ट रेट देण्यात आघाडीवर आहेत.

सीनियर सिटिझन्सला मिळतात जास्त रिटर्न
फिक्स डिपॉझिटचा जास्त फायदा हा ज्येष्ठ नागरिकांना होत असतो. कारण भारतातील ज्येष्ठ नागरिकांना एफडी रेट्समध्ये बँका अतिरिक्त रिटर्न देतात. बँकांनुसार हे अतिरिक्त रिटर्न वेगवेगळे असतात. जवळपास 50- 80 बेस पॉइट्स सामान्यांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना जास्त मिळतात. ज्यामुळे परताव्यामध्ये मोठी वाढ होते.

यूनिटी स्मॉल फायनान्स बँक : ही बँक 9 टक्के सर्वाधिक रिटर्न मिळते. एक वर्षांच्या एफडीवर येथे 7.35 टक्के रिटर्न मिळतं. तीन वर्षांच्या एफडीवर 7.65 टक्के रिटर्न, पाच वर्षांच्या एफडीवर 7.65 टक्के रिटर्न मिळतं. तर ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त रिटर्न मिळतं.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक: ही बँक 8.65 टक्के उच्चतम रिटर्न देते. एक वर्षांच्या एफडीवर येथे 6.85 टक्के रिटर्न दिलं जातं. तीन वर्षांच्या एफडीवर 8.60 टक्के रिटर्न मिळतं, पाच वर्षांच्या एफडीवर 8.25 टक्के रिटर्न दिलं जातं. तर ज्येष्ठ नागरिकांना 0.40-0.50 टक्के अतिरिक्त रिटर्न देण्यात येतं.

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक : ही बँक 8.61 टक्के सर्वाधिक रिटर्न देते. एक वर्षांच्या एफडीवर 7.65 टक्के रिटर्न मिळतं. तीन वर्षांच्या एफडीवर 8.11 टक्के रिटर्न, पाच वर्षांच्या एफडीवर 8.00 टक्के रिटर्न मिळतं. ज्येष्ठ नागरिकांना 0.60 टक्के अतिरिक्त रिटर्न मिळतं.

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक : ही बँक 8.50 टक्के उच्च रिटर्न देते. एक वर्षांच्या एफडीवर येथे 8.20 टक्के रिटर्न दिलं जातं. तीन वर्षांच्या एफडीवर 8.00 टक्के रिटर्न मिळतं. पाच वर्षांच्या एफडीवर 7.25 टक्के रिटर्न दिलं जातं. तर ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त रिटर्न देण्यात येतं.

जन स्मॉल फायनान्स बँक : ही बँक 8.50 टक्के उच्च परतावा देते. एक वर्षांच्या एफडीवर येथे 8.50 टक्के परतावा मिळतो. तीन वर्षांच्या एफडीवर 7.25 टक्के रिटर्न मिळतं. पाच वर्षांच्या एफडीवर 7.25 टक्के परतावा मिळतो. तर ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त रिटर्न दिलं जातं.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक: ही बँक 8.50 टक्के उच्च परतावा देते. एक वर्षांच्या एफडीवर येथे 8.00 टक्के परतावा दिला जातो. तीन वर्षांच्या एफडीवर 8.50 टक्के रिटर्न मिळतं, पाच वर्षांच्या एफडीवर 7.50 टक्के रिटर्न दिलं जातं. येथे ज्येष्ठ नागरिकांना 0.60 टक्के अतिरिक्त परतावा मिळतो.

एसबीएम बँक : या बँकेत 8.25 टक्के उच्च परतावा दिला जातो. एक वर्षांच्या एफडीवर येथे 7.05 टक्के रिटर्न दिलं जातं. तीन वर्षांच्या एफडीवर 7.30 टक्के परतावा मिळतो, पाच वर्षांच्या एफडीवर 7.75 टक्के परतावा मिळतो. तर ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त रिटर्न दिलं जातं.

ESAF स्मॉल फायनान्स बँक: ही बँक 8.25 टक्के उच्च परतावा देते. एक वर्षांच्या एफडीवर येथे 6.00 टक्के रिटर्न दिलं जातं. तीन वर्षांच्या एफडीवर 6.75 टक्के परतावा मिळतो. पाच वर्षांच्या एफडीवर 6.25 टक्के रिटर्न दिलं जातं. तर ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त रिटर्न मिळते.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक : ही बँक 8.25 टक्के उच्च रिटर्न देते. एक वर्षांच्या एफडीवर येथे 8.25 टक्के रिटर्न मिळतं. तीन वर्षांच्या एफडीवर 7.20 टक्के रिटर्न, पाच वर्षांच्या एफडीवर 7.20 टक्के रिटर्न मिळतं. तर ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त रिटर्न मिळतं.

एयू स्मॉल फायनान्स बँक: ही बँक 8.00 टक्के उच्च रिटर्न देते. एक वर्षांच्या एफडीवर येथे 6.75 टक्के रिटर्न मिळतं. तीन वर्षांच्या एफडीवर 8.00 टक्के रिटर्न, पाच वर्षांच्या एफडीवर 7.25 टक्के रिटर्न मिळतं. तर ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त रिटर्न मिळतं.

आरबीएल बँक : या बँकेत 8.00 टक्के उच्च रिटर्न देते. एक वर्षांच्या एफडीवर येथे 7.50 टक्के रिटर्न मिळतं. तीन वर्षांच्या एफडीवर 7.50 टक्के रिटर्न, पाच वर्षांच्या एफडीवर 7.10 टक्के रिटर्न मिळतं. तर ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त रिटर्न मिळतं.

डीसीबी बँक : येथे 8.00 टक्के उच्च रिटर्न देते. एक वर्षांच्या एफडीवर येथे 7.15 टक्के रिटर्न मिळतं. तीन वर्षांच्या एफडीवर 7.60 टक्के रिटर्न, पाच वर्षांच्या एफडीवर 7.40 टक्के रिटर्न मिळतं. तर ज्येष्ठ नागरिकांना 0.50-0.60 टक्के अतिरिक्त रिटर्न मिळतं.

बंधन बँक : या बँकेमध्ये 7.85 टक्के उच्च रिटर्न देते. एक वर्षांच्या एफडीवर येथे 7.25 टक्के रिटर्न मिळतं. तीन वर्षांच्या एफडीवर 7.25 टक्के रिटर्न, पाच वर्षांच्या एफडीवर 5.85 टक्के रिटर्न मिळतं. तर ज्येष्ठ नागरिकांना 0.50-0.75 टक्के अतिरिक्त रिटर्न मिळतं.

इंडसइंड बँक : या ठिकाणी 7.85 टक्के उच्च रिटर्न देते. एक वर्षांच्या एफडीवर येथे 7.50 टक्के रिटर्न मिळतं. तीन वर्षांच्या एफडीवर 7.25 टक्के रिटर्न, पाच वर्षांच्या एफडीवर 7.25 टक्के रिटर्न मिळतं. तर ज्येष्ठ नागरिकांना 0.40-0.75 टक्के अतिरिक्त रिटर्न मिळतं.

शिवालिक स्मॉल फायनान्स बँक : ही बँक 7.80 टक्के उच्च रिटर्न देते. एक वर्षांच्या एफडीवर येथे 7.80 टक्के रिटर्न मिळतं. तीन वर्षांच्या एफडीवर 7.50 टक्के रिटर्न, पाच वर्षांच्या एफडीवर 6.50 टक्के रिटर्न मिळतं. तर ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त रिटर्न मिळतं.

IDFC फर्स्ट बँक : या बँकेमध्ये 7.75 टक्के उच्च रिटर्न देते. एक वर्षांच्या एफडीवर येथे 6.50 टक्के रिटर्न मिळतं. तीन वर्षांच्या एफडीवर 7.25 टक्के रिटर्न, पाच वर्षांच्या एफडीवर 7.00 टक्के रिटर्न मिळतं. तर ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त रिटर्न मिळतं.

येस बँक : ही बँक 7.75 टक्के उच्च परतावा देते. एक वर्षांच्या एफडीवर येथे 7.25 टक्के रिटर्न मिळतं. तीन वर्षांच्या एफडीवर 7.25 टक्के रिटर्न, पाच वर्षांच्या एफडीवर 7.25 टक्के रिटर्न मिळतं. तर ज्येष्ठ नागरिकांना 0.50-0.75 टक्के अतिरिक्त रिटर्न मिळतं.

पंजाब अँड सिंध बँक : ही बँक 7.40 टक्के उच्च रिटर्न देते. एक वर्षांच्या एफडीवर येथे 6.20 टक्के रिटर्न मिळतं. तीन वर्षांच्या एफडीवर 6.00 टक्के रिटर्न, पाच वर्षांच्या एफडीवर 6.00 टक्के रिटर्न मिळतं. तर ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त रिटर्न मिळतं.

पंजाब नॅशनल बँक : ही बँक 7.25 टक्के उच्च रिटर्न देते. एक वर्षांच्या एफडीवर येथे 6.75 टक्के रिटर्न मिळतं. तीन वर्षांच्या एफडीवर 7.00 टक्के रिटर्न, पाच वर्षांच्या एफडीवर 6.50 टक्के रिटर्न मिळतं. तर ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त रिटर्न मिळतं.

बँक ऑफ बडोदा: ही बँक 7.25 टक्के उच्च रिटर्न देते. एक वर्षांच्या एफडीवर येथे 6.85 टक्के रिटर्न मिळतं. तीन वर्षांच्या एफडीवर 7.25 टक्के रिटर्न, पाच वर्षांच्या एफडीवर 6.50 टक्के रिटर्न मिळतं. तर ज्येष्ठ नागरिकांना 0.50-1.00 टक्के अतिरिक्त रिटर्न मिळतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here