सोने-चांदी ग्राहकांना पावले. या महिन्यात 5 ते 6 दिवस वगळता इतर दिवशी सोने-चांदीच्या किंमतीत नरमाई दिसली. 15 दिवसांत सोन्यात 2150 रुपयांनी तर चांदीत 4400 रुपयांनी पडझड झाली. अधूनमधून सोने-चांदीने चमकदार कामगिरी दाखवली.
आठवड्याच्या शेवटी आणि पहिल्या दिवशी सोन्यात उसळीचा ट्रेंड दिसून आला. गेल्या आठवड्यात 19 आणि 20 जानेवारी रोजी सोन्यात दरवाढ झाली. त्यानंतर रविवारी आणि सोमवारी किंमतीत कोणताही बदल झाला नाही. सोमवारी सराफा बाजाराच्या महासंघाने सुट्टी जाहीर केल्याने भाव जाहीर झाले नाहीत. अशा आहेत सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 23 January 2024)
सोन्याचा भाव काय
5 ते 6 दिवस वगळता सोन्यात पडझड दिसून आली. सोने 2150 रुपयांनी उतरले. गेल्या आठवड्यात 16, 17 आणि 18 जानेवारीला सोने क्रमशः 100, 350 आणि 300 रुपयांनी स्वस्त झाले. तर शुक्रवारी, 19 जानेवारी 330 रुपयांनी तर 20 जानेवारी रोजी 100 रुपयांची वाढ झाली. रविवारी आणि सोमवारी भावात बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीचा ग्राहकांना दिलासा
जानेवारी महिन्यात चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. 10 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान चांदी 1400 रुपयांनी वधारली. तर त्याअगोदर चांदीत 3100 रुपयांची घसरण झाली होती. 16 जानेवारी रोजी किंमतीत 300 रुपयांनी, 17 जानेवारीला 600 रुपयांनी तर 18 जानेवारी रोजी भावात 400 रुपयांची घसरण झाली. 19 जानेवारीला चांदी 200 रुपयांनी वधारली. 20 जानेवारी रोजी तितकीच घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदीचे भाव उतरले. 24 कॅरेट सोने 62,390 रुपये, 23 कॅरेट 62,140 रुपये, 22 कॅरेट सोने 57,149 रुपये झाले. 18 कॅरेट 46,793 रुपये, 14 कॅरेट सोने 36,498 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,228 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.