श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या ‘मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धे’चा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. विजेत्या कुस्तीपटूंना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
शाहू कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून ही कुस्ती स्पर्धा सुरू झाली. यंदाचे या स्पर्धेचे 37 वे वर्ष असून जवळपास 543 मल्लांनी यामध्ये सहभाग घेतला होता. महिला व पुरुष अशा स्वतंत्र विभागात एकूण 31 गटात दोन मॅटवर या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. कुस्तीप्रेमींनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
स्वर्गीय राजेसाहेबांचे क्रीडाविषयक विचार आजही या स्पर्धेच्या व विविध उपक्रमांच्या माध्यमातून अविरत जपले जात आहेत. ही परंपरा अखंडितपणे चालू ठेवण्यासाठी आम्ही नेहमीच कटीबद्ध आहोत. असे उदगार यावेळी राजे समरजीत घाडगे यांनी काढले.