राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाच्या अल्पसंख्याक विभागाच्या कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्षपदी अब्दुलहमीद शाहाजान मिरशिकारी उर्फ लालूभाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याहस्ते मुंबई येथे लालूभाई यांना नियुक्तीपत्र प्रदान करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री हसन मुश्रीफ राष्ट्रवादी शहराध्यक्ष आदिल बाबू फरास प्रदेश निरीक्षक नजीब मुल्ला, राज्यप्रमुख इद्रिस नायकवडी, प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण यांच्यासह नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन लालूभाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. ते पुढे म्हणाले माझे मोठे काका हरून उस्मान मिरशिकारी हे सामाजिक कार्यकर्ते होते.
ते इंडो बेकरीचे संस्थापक अध्यक्षही होते. लोकांना मदत करणे त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणे, सामाजिक कार्य करणे त्यांना आवडत असे. दुर्दैवाने २०१३ साली त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन मी सामाजिक कार्यात उतरलो. त्यानंतर हळूहळू राजकारणात सक्रिय झालो. सुरवातीला माझ्याकडे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे शहर अध्यक्ष पद होते. यासह इंडो बेकारीचे चेअरमन पद देखील सांभाळत आहे.
यापूर्वी सामाजिक काम करत असताना. त्यानंतर आमदार हसन मुश्रीफ यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन मी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर शहराध्यक्ष आदिल बाबू फरास यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँगेस अजितदादा गटात प्रवेश केला. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन असे आश्वासन अब्दुलहमीद शाहाजान मिरशिकारी उर्फ लालूभाई यांनी यावेळी दिले. लालूभाई हे राष्ट्रीय पाळीवरील रायफल शूटिंग नेमबाज देखील आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव केला जात आहे