राधानगरी तालुका; व्यापारी महासंघ काम करत आहे त्यांनी ग्राहकांना चांगला सुविधा देऊन व्यापार वाढवावा- श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

0
55

राधानगरी/ प्रतिनिधी विजय बकरे

राधानगरी तालुका व्यापारी बंधूंचा तालुकास्तरीय स्नेह मेळावा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थिती राधानगरी येथे संपन्न झाला.
यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले की ग्राहकांना चांगली सुविधा प्रदान करून व्यापार वाढवा. महासंघाची स्थापना राजर्षी शाहू महाराज यांनी सन १९०८ साली केली. गेली कित्येक वर्षे पिड्यांनपिड्यांचा वारसा असलेले अनेक व्यापारी बांधव या तालुक्यात आहेत या सर्वांना एकत्र घेऊन राधानगरी तालुका व्यापारी महासंघाची स्थापना केलेली आहे. राधानगरी तालुक्यातील सर्व गावांमध्ये स्थानिक व्यापारी संघटना कार्यरत असुन या सर्वांची शिखर संघटना म्हणुन राधानगरी तालुका व्यापारी महासंघ काम करत आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगल्या सुविधा देऊन व्यापार वाढवता येऊ शकतो.
सदर मेळाव्यामध्ये वजन मापे, औषध प्रशासन, जी.एस.टी., प्राप्तिकर व्यवसायकर या विविध विषयांवर प्रमुख मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रम दरम्यान सतीश फणसे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला .
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, आमदार.प्रकाश आबिटकर, विनोद घोडावत ग्रुपचे चेअरमन विनोदजी घोडावत, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मुंबईचे अध्यक्ष.ललितजी गांधी, ऑल इंडिया कंझ्युमर प्रॉडक्टस डिस्ट्रीब्यूशन फेडरेशन दिल्लीचे अध्यक्ष.धैर्यशील पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजीत तायशेटे, कॉन्फरडेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स कॅट महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सचिन भाऊ निवंगुणे, अनिल बडदारे, संतोष कावळे, संतोष तायशेटे, नितीन केरकर, मारुती टेपुगडे, बाळासाहेब कळमकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकनाथ चौगुले, सूत्रसंचालन सागर चौगुले यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार दीपक तेली यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here