प्रतिनिधी : प्राध्यापिका मेघा पाटील
कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील एका छोट्याशा आळवे गावातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील असलेले आनंदराव चौगुले यांना 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी खास विशेष अतिथी म्हणून त्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या राष्ट्रीय परेडमध्ये उपस्थित राहण्यासाठी आळवे गावातील दाम्पत्यास निमंत्रण देण्यात आले आहे. शेतकरी व केदारलिंग सूतगिरणीचे संचालक आनंदराव चौगुले आणि माजी सरपंच सुनंदा चौगुले असे या दांपत्याचे नाव आहे.दिल्ली येथे पंतप्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत लाल किल्ल्यावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात शासनाद्वारे विशेष अतिथी म्हणून या दांपत्याचे निवडशासनाद्वारे विशेष अतिथी म्हणून या निवड झाली आहे.याबाबतचे पत्र सहाय्यक आयुक्त अ.मा .पाटील यांनी दिले आहेत.या निवडीसाठी आमदार डॉक्टर विनय कोरे यांचे विशेष सहकार्य मिळाले.