कोल्हापूर प्रतिनिधी विजय बकरे
म्हासरंग-अनफ मार्गाचे डांबरीकरण न करता बिल घेऊन ठेकेदार गायब! म्हासरंग ते अनफ दरम्यान 2022 मध्ये जि. प. च्या निधीतून 900 मीटर रस्ता मंजूर झाला त्याच्या कामासाठी 30 लाखांचा निधी प्राप्त झाला.
ठेकेदाराने फक्त खडीवर डांबर टाकले आहे डांबरीकरण केलेले नसतानाही अधिकाऱ्यांनी रनिंग बिल 25 लाखाहून जास्त दिले आहे त्यामुळे बिला पेक्षा अधिक रक्कम अदा केली आहे
काम पूर्ण न करता ठेकेदाराला या कामाचे बिल कसे काय अदा केले?बिल काढण्यापूर्वी कामाचे मूल्यांकन कसे केले याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली
त्यावेळी ते बोलताना म्हणाले की शासन आपल्या दारी अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण तालुक्यामध्ये राज्य शासनाच्या वतीने राबवत असून एका बाजूला भुदरगड तालुक्यामध्ये असे अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे उघड होत आहेत ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या संबंधित इंजिनियर व उपअभियंतांना निलंबित करून त्यांच्यावर कडक कारवाई करून सदर रक्कम वसूल करण्याचे आदेश काढण्यात
यावे अन्यथा शिवसेनेच्या वतीने आपल्या कार्यालयाच्या दारात उपोषणास बसणार आहोत यावेळी तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, मेरी डिसोजा, श्रीकांत हवळ, वसंत कांबळे, महिला संघटक माया शिंदे, विभाग प्रमुख अनिल देसाई, महेश पाटील,अजित सुतार, संदीप पाटील, महादेव मसुरेकर, प्रफुल्ल नलवडे, महादेव मुरमुरे,नारायण कांबळे, अशा आबिटकर, संभाजी कांबळे, मनोहर नलवडे, बाबुराव कांबळे आधी उपस्थित होते.