शाहूवाडी येथे संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दाकाळ योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना या सर्व योजनेंतर्गत पात्र ६०३ लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप आमदार डॉ.विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच मलकापूर मंडळनिहाय मंजूर झालेले गाव व एकूण लाभार्थ्यांची संख्या आंबार्डे-१८,आरूळ-१६,उचत-१९,ओकोली-११,कडवे-४९,कोपार्डे-२६,कोळगांव-०९,चनवाड-१२,टेकोली-१८,पणुद्रे-२४,परळे-११,पातवडे-१०,पेरीड-३४,मलकापूर-९३,माण-२१,म्हाळसवडे-०८,येलूर-२३,शिरगांव-१९,सवते-१८ तसेच आंबा मंडळनिहाय मंजूर झालेले गाव व एकूण लाभार्थ्यांची संख्या आंबा-१२,उदगिरी-०७,कासार्डे-१९,केर्ले-०७,चांदोली-०२,चाळणवाडी-०६,तळवडे-०४,निळे-११,परळीनिनाई-३५,पुसार्ले-०६,भेंडवडे-१४,लोळाणे-०९,वोकोली-१२,वारुळ-०४,वालूर-१६ अशा एकूण ६०३ लाभार्थ्यांना मंजूर पत्राचे वाटप आमदार डॉ.विनय कोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होऊन सुद्धा शाहूवाडी तालुक्यात संजय गांधी निराधार योजना व इतर योजनेमधील लाभार्थ्यांची संख्या ३२३३ वर होती त्यानंतर शाहूवाडी तहसील कार्यालयामार्फत मागील दिड महिन्यांमध्ये सुमारे २८०० लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना व इतर योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला.
यावेळी शाहूवाडी तहसीलदार रामलिंग चव्हाण,नायब तहसीलदार रविंद्र मोरे,कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरीडकर),कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबासो लाड,कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शंकर पाटील,शाहूवाडी पंचायत समितीचे माजी सभापती महादेव पाटील,माजी सभापती पंडीतराव नलवडे,शाहूवाडी पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब गद्रे,रंगराव खोपडे,शाहूवाडी पंचायत समितीचे माजी सदस्य अमर खोत,मलकापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर तसेच मंडल अधिकारी,सर्व गावचे तलाठी,सर्व पोलीस पाटील यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.