कागल: कागल शहर येथील प्रभाग क्रमांक दोन मधील श्रमिक वसाहतला लागून आधार कॉलनी व मोमिन मळा परिसराला लागून बऱ्याच वर्षापासून वसलेल्या कॉलनीतील रहिवाशी लोकांना परिसराचे कोणतीही नाव नसलेले त्या ठिकाणी येणारे नागरिकांना,नातेवाईक,मित्रपरिवार तसेच इतर कागदपत्रे पत्ता व व्यवहार करण्यास अडचणीची होत असल्याने परसातील सर्व नागरिक एकत्र येऊन आपल्या कॉलनीला “सह्याद्री पार्क” असे नाव द्यावे याविषयीचे निवेदन दिले.
नितीन दिंडे यांनी पालकमंत्री ना.श्री.हसनसो मुश्रीफ साहेब यांचे निदर्शनास आणून दिल्यानंतर पालकमंत्री ना.श्री.हसनसो मुश्रीफ साहेब यांनी कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री.पवन म्हेत्रे यांना तात्काळ यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.या कामी नितीन दिंडे यांनी केलेल्या सततच्या पाटलागामुळे श्री.पवन म्हेत्रे यांनीही यावर त्वरित कारवाई करून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून नागरिकांचे म्हणणे लक्षात घेऊन या परिसरास सह्याद्री पार्क हे नाव देण्यास कोणतेही अडचण नसलयाचे निदर्शनास येतात कागल नगरपालिकेत ठराव करून घेऊन या परिसरास “सह्याद्री पार्क” असे नाव देण्यात यावे याबाबतचे लेखी आदेश दिले.२६ जानेवारी २०२४ या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून परिसरातील लोकांनी सह्याद्री पार्क या नामफलकाचे उद्घाटन आज नितीन दिंडे यांच्या शुभहस्ते केले.
कोणतीही सह्याद्री पार्क हे नामकरण केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले व या लोकांना पत्ता सांगणे,नातेवाईकांना पत्ता सांगणे,पत्र व्यवहार करणे हे सोयीचे झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. त्वरित पाठपुरावा करून नामकरणाची कारवाई पूर्ण केल्याबद्दल नागरिकांनी नितीन दिंडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या अडीअडचणी सोडवणे प्रभागातील सर्व प्रलंबित कामे मार्गी लावण्याची ग्वाही नितीन दिंडे यांनी दिली.