प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस च्या अजित पवार गटाच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदावरून थेट प्रदेश उपाध्यक्ष पदावर ए वाय पाटलांना बढती देण्यात आली आहे. दूधगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत घेतलेली भुमिका भोवली अशी चर्चा समाज माध्यमात होत असतानाच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र हि नियुक्ती त्यांच्या इच्छेनुसार झाली असल्याची माहिती आज माध्यमांशी बोलताना दिली.