सानिया मिर्झा हिची घटस्फोटानंतर पहिली इन्स्टाग्राम पोस्ट, एक शब्दात सांगितलं फार काही

0
68

भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झाहिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. सानिया हिने अनेक नवे रेकॉर्ड रचत भारतीयांच्या मनात घर केलं. सानिया हिला प्रोफेशनल आयुष्यात यश मिळालं. पण सानिया हिने खासगी आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला.

सानिया हिचा पहिला पती आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केलं आहे. दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

घटस्फोटानंतर सानिया हिने शोएब याला नव्या आयुष्याच्या शुभेच्छा दिल्याचं देखील समोर आलं. आता घटस्फोटानंतर पहिल्यांदा सानिया हिने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. काळ्या रंगातील फोटो पोस्ट करत सानिया हिने कॅप्शनमध्ये ‘रिफ्लेक्शन..’ असं लिहिलं आहे.

सोशल मीडियावर सानिया हिने एका शब्दात खूप काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सानिया हिच्या पोस्टवर अनेक नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. तर अनेकांनी शोएब याला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘शोएब मलिक हेट बटन…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सानिया आम्ही तुझ्यासोबत आहोत..’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘सानियासाठी रिस्पेक्ट बटन…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सानिया हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.

रिपोर्टनुसार, शोएब मलिक याच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून सानिया हिने स्वतःने पतीला घटस्फोट दिला. आता सानिया तिच्या मुलासोबत जगत आहे. सानिया आणि तिचा मुलगा दुबई येथे राहतात. घटस्फोटानंतर सानिया पुन्हा भारतात येणार का? अशा चर्चा देखील जोर धरत आहेत.

सानिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, सानिया हिने कायम स्वतःचं खासगी आयुष्य गुपित ठेवलं. पण सोशल मीडियावर सानिया कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर सानिया कायम मुलासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सोशल मीडियावर सानिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या सानिया तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here