मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ज्युस पित जरांगेंचं उपोषण मागे

0
70

गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनालास अखेर यश आले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करत अध्यादेश काढला आहे.शनिवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्युस पिऊन जरांगेंनी आपले उपोषण मागे घेतले.

कुणबी प्रमाणपत्र सापडलेल्या मराठ्यांच्या सगेसोयऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ द्यावा. तसेच नोंदी सापडलेल्यांना लवकरात लवकर कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. या मागण्या मान्य करत राज्य सरकारने आपले आश्वासन पुर्ण केले आहे.

२० जानेवारी रोजी निघालेला लाखों मराठ्यांचा मोर्चा शुक्रवारी वाशीत येऊन पोहोचला. त्यानंतर मनोज जरांगेंनी सरकारकडे अध्यादेश काढण्याची मागणी केली. राज्य सरकारकडून ही मागणी मान्य करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्युस पित जरांगेंनी आपले उपोषण मागे घेतले. यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मंत्री दीपक केसरकर हेदेखील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here