प्रतिनिधी: प्राध्यापिका मेघा पाटील
कागल शहर : मराठा आरक्षणाचा अध्यादेश निघाला याचा मनापासून आनंद आहे मराठा आरक्षणासाठी अनेकांनी आपले प्राण दिले बऱ्याच मराठी युवकांना लाठ्या खाव्या लागल्या शासन पातळीवर असणारी नोकरीची संधी गमवावी लागली तरीही मराठे डगमगले नाहीत त्यांनी आपली संघटित शक्ती दाखवून दिली 1980 साल हे मराठा आरक्षणाच्या मागणीचे पहिले पर्व होते .
कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी 1980 ला मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली त्यानंतर 22 मार्च 1982 रोजी त्यांनी मुंबई मंत्रालयावर लाखो मराठ्यांचा मोर्चा काढला 22 मार्च 1982 रोजी भाषण करताना कैलासवासी अण्णासाहेब पाटील म्हणाले जर मी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ शकलो नाही तर उद्याचा दिवस माझ्या आयुष्यात उजाडणार नाही आणि घडलेही तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही त्यामुळे 23 मार्च या दिवशी कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी गोळी झाडून घेऊन स्वतःचेआयुष्य संपवले आज कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या बलिदानाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असे म्हणता येईल माननीय मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने लढा दिला ज्या पद्धतीने संघटन कौशल्य दाखवले आणि राजकारण विरहित या लढ्याचे नेतृत्व केले त्याला कुठल्याही प्रकारची तोड नाही एका सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेला एक माणूस व्यवस्थेसमोर केवढे मोठे आव्हान उभे करू शकतो आणि समाजाच्या हिताने निर्णय घेण्याला भाग पाडू शकतो याचा उत्तम दाखला आपल्याला पाहायला मिळाला माननीय मनोज जरांगे पाटील यांचे उपकार मराठा समाज कधीही विसरणार नाही मराठा समाजाच्या जडणघडणीमध्ये इथून पुढच्या रचनात्मक बदलांमध्ये जेव्हा जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा तेव्हा जरांगे पाटील यांची आठवण होईल जरांगे पाटील यांना त्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी मराठा समाज निमंत्रित करेल आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाज हिताच्या दृष्टीने मनोज तरंगे पाटील यांचे नेतृत्व आम्ही मनोमन स्वीकारू
कागल शहरांमध्ये सातत्याने सकल मराठा समाजाच्या माध्यमातून आम्ही विधायक काम करत आलो मराठा समाजाचे संघटन करणे राजकारण विरहित मराठा समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे मराठा समाजाचे प्रेरणास्त्रोत असणाऱ्या महापुरुषांच्या पुतळा उभारणीसाठी प्रयत्न करणे अशा अनेक माध्यमातून आम्ही हे काम पुढे भेटत राहिलो येत्या काळामध्ये मिळालेले आरक्षण शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करूच पण इथून पुढे आरक्षणाबरोबर मराठा तरुणांच आर्थिक सक्षमीकरण त्यांच्या शिक्षणासंदर्भातले महत्त्व असे निर्णय याबाबत एक विधायक आणि व्यापक चळवळ उभी करण्याचा आमचा मानस आहे.सकल मराठा समाजाचे अध्यक्ष श्री नितीन दिंडे, श्री प्रकाश जाधव, श्री शशिकांत भालबर,श्री सचिन मोकाशी ,श्री नाना बरकाळे,श्री.राहुल माने,श्री.अमित पाटील,श्री नितीन काळबर,महेश घाटगे, भिकाजी मगदूम,खाडे साहेब,तानाजी पिष्टे,प्रदीप कोराणे,प्रशांत म्हातोगडे अक्षय भोसले,अभिजीत भोसले,योगेश पाटील, इत्यादी सकल मराठा बांधवांचा समावेश होता.