प्रतिनिधी अभिनंदन पुरीबुवा पुणे : पुणे शहर पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ वय ५७ रा.पुणे यांचे आज सोमवारी निधन झाले आहे.धुमाळ यांच्या निधनामुळे पोलिस दलात सर्वत्र शोककळा पसरली आहे.
धुमाळ काही दिवसांपूर्वी एका दुर्घटना मध्ये जखमी झाले होते. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.आज उपचार सुरू असताना रात्री ९ च्या सुमारास रबी हाॅल क्लिनिक येथे त्यांचे निधन झाले आहे.धुमाळ हे राहत्या घरी सदानिकेतील गॅलरीतून पाय घसरून पडले होते.त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.ते भारती विद्यापीठ भागात वास्तव्यास होते.त्यांच्या पाश्च्यात त्यांच्या मागे पत्नी.मुलगा.भाऊ व विवाहित बहिण असा परिवार आहे.धुमाळ यांच्या निधनाची माहिती कळाल्यानंतर पुणे पोलिस दलात शोककळा पसरली आहे.