राष्ट्रवादी कॉँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लांबणीवर गेला आहे. याआधी या प्रकरणात 31 जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले होते.
सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणी दरम्यान आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय देण्यास विधानसभा अध्यक्षांना 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. या वेळी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्यावतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भात निकाल देण्यासाठी आणखी तीन आठडय़ांचा वेळ देण्याची मागणी केली. पण या प्रकरणातील मूळ याचिकादार राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून युक्तिवाद करताना ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी वेळ वाढवून देण्यास विरोध केला.
विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडून वेळ वाढवून मागणे, हे नेहमीच होत आहे. त्यामुळे फार फार तर एकच आठवडय़ाची मुदत त्यांना द्यावी, असे सिंघवी म्हणाले. यावर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नार्वेकर यांना तीन ऐवजी दोन आठवडय़ांची मुदत वाढवून देत 15 फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत निर्णय देण्यात यावा, असे निर्देश दिले.
उलटतपासणी पूर्ण
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या आमदारांची आज उलटतपासणी पूर्ण झाली. आज अजित पवार गटाचे अनिल पाटील यांची उलटतपासणी झाली. 2019 च्या निवडणुकीच्या एबी फॉर्मवर जयंत पाटील यांची स्वाक्षरी होती व ते प्रदेशाध्यक्ष असल्याचे पाटील यांनी मान्य केले. उद्यापासून दोन दिवस दोन्ही बाजूच्या वकिलांचे युक्तिवाद होतील व 31 जानेवारीला सुनावणी