कोल्हापूर:(प्रतिनिधी )प्रियंका शिर्के-पाटील
तुळजापूर (जि. धाराशिव) – शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शहरातील जुन्या बस स्थानकासमोर मंगळवार दुपारी रास्तारोको आंदोलन केले.
रासायनिक खतांची दरवाढ थांबवावी, बियाणे, किटकनाशकांच्या खरेदीवर जीएसटी लागू करू नये, वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण व्हावे म्हणून कुंपनासाठी १०० टक्के अनुदान द्यावे, पावसाअभावी खरीप पिकांचे माेठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, शेतीसाठी दिवसा सुरळीत वीज द्यावी, संपूर्ण कर्जमुक्ती करून द्यावी आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या नेतृत्वात मंगळवारी दुपारी तुळजापूर शहरातील जुन्या बस्थानकासमाेरील रस्त्यावर आंदाेलन करण्यात आले. दरम्यान, या आंदाेलनामुळे धाराशिव-लातूर-नळदुर्ग या मार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा ते पाऊण तास ठप्प हाेती. यावेळी राजाभाऊ हाके, नेताजी जमदाडे, कल्याण भोसले, जगदाळे यांच्यासह शेतकरी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.